धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? अजित पवार यांनी थेट दिले उत्तर

| Updated on: Jan 14, 2025 | 5:31 PM

वाल्मिक कराड याने शेतकऱ्यांकडून हार्वोस्टरसाठी पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. त्याची चौकशी केली जाणार आहे. दोषी असणाऱ्या कधी सोडणार नाही. कुठेही लाच द्यावी लागल्याचे पुरावे असतील तर सादर करा. दोषींवर आम्ही कारवाई करु. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? अजित पवार यांनी थेट दिले उत्तर
अजित पवार
Follow us on

santosh deshmukh murder case: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात तपास संस्थांकडून तपास सुरु आहे. या प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप असलेला वाल्मिक कराड याला मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे संबंध असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना मंगळवारी विचारण्यात आला. त्याला अजित पवार यांनी थेट उत्तर दिले.

काय म्हणाले अजित पवार

मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार का? या माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर अजित पवार यांनी थेट उत्तर दिले. अजित पवार म्हणाले, जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा, असे मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. त्यानुसार मुख्यमंत्री कारवाई करत आहेत. सत्ताधारी असो की विरोधी असो किंवा इतर कोणाचा संबंध या प्रकरणात समोर आला तर कोणालाही थारा दिला जाणार नाही. सर्वांवर कारवाई होणार आहे. आम्ही सर्वांनी हे स्पष्टपणे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी शब्द दिलाय…

अजित पवार पुढे म्हणाले, संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आहे. या प्रकरणात जे दोषी असतील ते कोणीही असले तरी त्यांच्यावर कारवाई होणार आहे. चौकशीत धागेदोरे कोणाचे मिळाले तरी त्यांच्यावर कारवाई होणार आहे. पोलीस यंत्रणा, सीआयडी आणि एसआयटीमार्फत या प्रकरणाचे काम सुरु आहे. तसेच न्यायालयीन चौकशी करण्याचा शब्दसुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

हे सुद्धा वाचा

वाल्मिक कराड याने शेतकऱ्यांकडून हार्वोस्टरसाठी पैसे घेतल्याचा आरोप केला आहे. त्याची चौकशी केली जाणार आहे. दोषी असणाऱ्या कधी सोडणार नाही. कुठेही लाच द्यावी लागल्याचे पुरावे असतील तर सादर करा. दोषींवर आम्ही कारवाई करु. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असे अजित पवार यांनी सांगितले.

बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक चांगला पाठवला आहे. त्यांना कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाला बळी न पडता योग्य ती कारवाई करण्याची मुभा त्यांना दिली आहे, असे अजित पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.