बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याच्या मागणीसाठी शनिवारी परभणीत मोर्चा काढण्यात आला. या सर्वपक्षीय मोर्चात भाजप आमदार सुरेश धस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे नाव न घेता जोरदार हल्ला चढवला. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आकाला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. पण आकाला वाचवण्याचा प्रयत्न आकाच्या आकाने केला तर ते गेलेच समजा. तसेच आकाच्या आकाला मारहाणीचा हा व्हिडिओ दाखवले असले तर आकाचे आका यांची जेलवारी निश्चितत आहे, असे आमदार सुरेध धस यांनी म्हणताना हिंदू गाण्यातून म्हटले, ‘करलो जल्दी तयारी, अब निकली है जेलवारी’.
आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना मोक्का लागला पाहिजे. त्यांना मोका लागला म्हणजे, चार पाच वर्ष ते काही बाहेर येत नाही. अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळात घेतले, त्यावर आमदार सुरेश धस यांनी जोरदार हल्ला केला. ते म्हणाले, अजितदादा क्या हुँआ तेरा वादा…आकाच्या आकाला मंत्रिमंडळात का घेतले. बीड जिल्ह्यातील सर्व हत्या कोणी घडवून आणली. त्याचे रेकॉर्ड पाहा. हवे तर त्यासाठी बारामतीची माणसे पाठवा, चौकशी करा. आमच्या जिल्हा बिन मंत्र्यांच्या राहू द्या. त्यानंतर लोक आनंदी राहतील, असे ते म्हणाले.
बीडमध्ये मराठा समाजालाच नव्हे तर इतर जातीच्या लोकांना पण काय वागणूक मिळत आहे, ते पाहिले गेले पाहिजे, असे सांगत आमदार सुरेश धस म्हणाले, मी अजितदादाला म्हणालो, आम्हाला मंत्रिपद नाही मिळाले. फडणवीस साहेबांची काही अडचण असेल. बीडमधून तुम्ही पण प्रकाश सोळंके किंवा राजेश विटकरला मंत्रिपद द्या.
राजेश विटेकर तुमच्या सोनपेठ तालुक्यात 13 हजार 190 हेक्टरवर बोगस पीकविमा भरला आहे. परळीच्या लोकांनी बीड, धाराशिव, लातूर, परभणीमध्ये विमा उतरवला आहे. एकाच माणसाने 8 ठिकाणी विमा भरला. त्यामुळे मग मी म्हणेन, ‘दादा क्या हुआ तेरा वादा…’, असे आमदार सुरेश धस यांनी म्हटले. आता मुख्यमंत्री साहेबांना माझी एकच मागणी आहे की, केवळ त्यांची चौकशी करू नका तर यांच्यावर मोक्का लावा.