Santosh Deshmukh Murder Case: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटी (विशेष तपास पथक) कडून सुरु आहे. या प्रकरणातील आरोपींना अटक झाली आहे. अनेक पुरावे एसआयटी आणि सीआयडीने मिळवले आहे. परंतु काही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न आरोपींनी केला होता. त्यात संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे व्हिडिओ आरोपींच्या मोबाईलमध्ये होते. ते व्हिडिओ आरोपींनी मोबाईलमधून डिलीट केले. त्यामुळे या प्रकरणात महत्वाचा पुरावा नष्ट झाला होता. परंतु एसआयटीने ते पुरावा रिकव्हर केला आहे. मोबाईलमधून डिलीट केलेला डाटा मिळवला आहे.
सरपंच संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचा व्हिडिओ एसआयटीने रिकव्हर केले. त्या व्हिडिओमध्ये आरोपी संतोष देशमुख यांना मारत होते आणि आनंद लुटत होते, असे दिसत असल्याचे एसआयटीने म्हटले आहे. आरोपींच्या फोनमध्ये हे व्हिडिओ होते. ते आरोपींना डिलीट केले होते. आता ते रिकव्हर करण्यात विशेष तपास पथकाला (एसआयटी) यश आले आहे. एसआयटीने हे पुरावे न्यायालयात हजर केले आहे.
एसआयटीने संतोष देशमुख हत्या प्रकरणातील महत्वाचे पुरावे न्यायालयात सादर केले. त्यात ४१ इंचचा एक गॅसचा पाईप आहे. त्या पाईपाच्या एका बाजूला काळ्या रंगाच्या करदोड्याने मूठ बांधली गेली आहे. लोखंडी तारेचे ५ क्लास बसवलेली एक मूठ आहे. संतोष देशमुख यांना मारताना जो लाकडी दांडका वापरला आहे, तो न्यायालयात सादर केला आहे. मारहाणीत वापरलेले तलवारीसारखे शस्त्र आहे. तसेच लोखंडी रॉड आणि कोयता एसआयटीने न्यायालयात सादर केला आहे.
संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर रोजी हत्या झाली होती. त्यानंतर या प्रकरणात सर्वपक्षीय नेत्यांनी आवाज उठवला. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता असलेला वाल्मिक कराड प्रमुख संशयित आरोपी आहे. त्याच्यावर अजून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.