पुणे : ठाकरे गटाचे युवा नेते वरुण सरदेसाई यांच्यावर भाजप आमदार योगेश सागर यांनी हिवाळी अधिवेशनात गंभीर आरोप केले होते, त्यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी केली जाईल असे उत्तर दिले होते. त्यावरून माध्यमांमध्ये आलेले वृत्त पाहून वरुण सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावरच हल्लाबोल करत बाहेर बोलून दाखवा असं आवाहन केले आहे. विधानसभेत अधिकारांचा वापर करून बोलून दाखवा मग मी दावा दाखल करतो की नाही बघा अशी स्पष्ट भूमिकाच वरुण सरदेसाई यांनी घेतली आहे. ठाकरे गटाचे आमदार त्यांचा घोटाळा बाहेर काढत असल्याने ते बदनाम करण्याचे राजकारण करीत असल्याचा आरोपही वरुण सरदेसाई यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत वरुण सरदेसाई यांनी म्हंटलं आहे की, हिवाळी अधिवेशन नागपूर इथं सुरू होतं, त्यामध्ये भाजपचे आमदार योगेश सागर यांनी आरोप केले. या आरोपात काही तथ्य नाही. मी यावर प्रतिक्रिया देणं टाळल होतं मात्र, ज्यावेळी बातम्या आल्या तेव्हा आपली बाजू कळाली पाहिजे म्हणून ही पत्रकार परिषद घेत असल्याचे म्हंटले आहे.
स्काऊट अँड गाईड ही संस्था जगातील 100 देशात प्रशिक्षण देते, चिपळूण इथं ज्यावेळी पुरस्थिती निर्माण झाली तेव्हा काम केलं आहे.
स्काऊट् अँड गाईड ही संस्था केंद्र सरकार मान्यता आहे, त्याचं तुम्ही अध्यपक्षद घ्या. 2019 ला महाराष्ट्राने अध्यक्ष पद घेतलं आणि राज्य सरकारने त्याला मान्यता दिली आहे.
केंद्र सरकार मान्यता आणि राज्य सरकारने याला मान्यता दिली आहे, त्या जी आर ची कॉपी माझ्याकडे आहे. केंद्र सरकारच्या जीआरची कॉपी दाखवत वरुण सरदेसाई यांनी हल्लाबोल केला आहे.
सुरूवातीला कोव्हीड होता त्यामुळे एकच कँम्प घेता आला, नागपूरला हा कँम्प झाला, जानेवारी महिन्यात हा कँम्प झाला, त्याचे हे सगळे फोटो आहेत, एकच कँम्प झाला तरीदेखील आरोप करण्यात आले.
मुळात मी जबाबदारींनं सांगतो, त्यांनी सात ते आठ मुलांची नावं घेतलीय त्यांना मी ओळखत नाही, माझा आणि त्यांचा फोनवर संपर्क झालेला नाही, अनेक संस्था राज्यात काम करतात त्या एखाद्या संस्थेला मान्यता नसेल त्यांनी फसवणूक केली असेल.
त्यात या संस्थेचा संबंध नाही, जे सगळं काही नीच पद्धतीचं राजकारण सुरू आहे, भाजपचे आमदार हे असे आरोप करतात, त्यांनी बाहेर येऊन केलं असतं मानहानीचा दावा केला असता मात्र त्यांनी ते सभागृहात केले.
सहा मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढले पुराव्यासहित त्यामुळे शिवसेना नेत्यांवर कसं आरोप करता येईल त्यासाठी सगळा नीच प्रकार सुरू आहे, त्यांच्याकडे एकही कागद नाही, चौकशी करायची ती करावी.
पेन डाईव्ह माध्यमांना द्या, बाहेर येऊन त्यांनी समोरासमोर येऊन बोलावं, मी मानहानीचा दावा नक्की दाखल करेन, यामध्ये भरतीच होत नाही हे सगळं राजकीय द्वेषापोटी सुरू असल्याचे वरुण सरदेसाई यांनी म्हंटले आहे.