सातारा : साताऱ्यात दीड वर्षाची बालिका चोरी प्रकरणाच्या तपासानंतर अखेर सातारा पोलिसांनी मंगळवार पेठेतील कुचेकर(Kuchekar) दाम्पत्यांच्या दीड वर्षाच्या बालिकेचे अपहरण झाले असल्याची तक्रार अखेर शहर पोलिसांत(City Police) दाखल केली आहे. या प्रकरणी बाबर(Babar) दाम्पत्यावर सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित पीडितेच्या तक्रारीवरून बाबर दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. याचा सखोल तपास सातारा पोलीस करत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली. या प्रकरणाचा सातारा पोलीस योग्य तपास करून सत्य समोर आणतील असेही शंभूराज देसाई म्हणाले. दरम्यान गृहराज्यमंत्र्यांनी कुचेकर दाम्पत्याची घरी जाऊन विचारपूस करत कुटुंबियांना धीर दिला आहे. (A complaint of abduction of a minor girl has finally been lodged with the Satara city police)
बालकल्याण समितीच्या आदेशावरून सध्या बालिकेला म्हसवडच्या बालसुश्रुषागृहात ठेवण्यात आले आहे. बालकल्याण समिती बालिकेच्या कस्टडीबाबत जो निर्णय देईल, त्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक बोऱ्हाडे यांनी सांगितले. आरोपींच्या चौकशीमध्ये जे निष्पन्न होईल, त्याआधारे पुढील कारवाई केली जाईल, असेही बोऱ्हाडे नमूद केले होते.
हा सर्व प्रकार दोन्ही बाजूने संशयास्पद असल्यामुळे शहर पोलिस विविध बाबींच्या अनुषंगाने याचा तपास करीत आहेत. याबाबतची तक्रार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणात खाजगी सावकारीचा काही प्रकार आहे का, या अनुषंगानेही तपास करीत आहेत. बाबर दाम्पत्य जर खाजगी सावकारी करीत असेल तर त्यासंदर्भात काही पुरावे हाती लागतात का हेही तपासले जातील. त्यासाठी त्यांच्या घराची झडती घेतली जाईल. तसेच काही साक्षीदार किंवा इतर पुरावे तपासून पुढील कारवाई केली जाईल, असेही बोऱ्हाडे यांनी सांगितले. (A complaint of abduction of a minor girl has finally been lodged with the Satara city police)
इतर बातम्या