सातारा : रात्रीची वेळ होती. अजित सज्जनगडावरून जात होते. अचानक गाडीवरून नियंत्रण सुटले. त्यामुळे टवेरा थेट ८०० फूट खोल दरीत कोसळली. गाडी कोसळ्याचे बाजूच्यांच्या लक्षात आले. रात्री पोलिसांना कळवण्यात आले. सकाळी दरीत मृतदेहाचा शोध घेण्यात आला. कारचा चक्काचूर झाला आहे. शिवाय कारमधील चालकही मृतावस्थेत सापडला. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. तो मृतदेह अजित नामक व्यक्तीचा असल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांना कळवण्यात आले.
साताऱ्यातील सज्जनगड येथे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. साताऱ्याहून सज्जनगडकडे निघालेल्या तवेराचा सज्जनगडचा घाट चढत असताना तीव्र वळणावर अपघात झालाय. या अपघातात तवेरा गाडीचे नियंत्रण सुटून गाडी 800 फूट खोल दरीत गेली. यामध्ये अजित शिंगरे राहणार सज्जनगड यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.
रात्री उशिरा या अपघाताचा आवाज स्थानिक नागरिकांना आला. त्यानंतर नागरिकांनी दरीच्या दिशेने धाव घेतली. संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे निदर्शनास आले. सातारा तालुका पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके हे आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी गेले.
संबंधित व्यक्तीचा मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने आज सकाळी बाहेर काढण्यात यश आले. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी सातारा जिल्हा शासकीय रुग्णालय दाखल केला आहे. या अपघाताची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
छोटीशी चूक किती महागात पडू शकते, हे या अपघातातून दिसून येते. गड चढत असताना वळण असतात. अशावेळी गाडी व्यवस्थित चालवावी लागते. थोडी नजरचूक झाल्यास चुकीला माफी नसते. अशीच चूक झाल्याने अजित यांना प्राण गमवावे लागले.
रात्रीच्या सुमारास जाणाऱ्यांचे अपघात वाढत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे रात्रीचा प्रवास शक्यतो टाळावा, असा सल्ला अजित पवार यांनी दिला होता. तरीही काही जणांना आवश्यक असल्याने रात्री प्रवास करावा लागतो. अशावेळी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.