पुणे – पुणे (PUNE) सातारा (SATARA) मार्गावरील खेड शिवापूर टोल (KHED SHIVAPUR TOLL) नाक्यावरील टोल वसुली वरून खेड शिवापूर टोल नाका हटाव कृती समिती आक्रमक झाली आहे. टोल नाक्यावरील टोल वसुली तात्काळ बंद करून, टोलनाका स्थलांतराची प्रक्रिया सुरू करावी अशी मागणी खेड शिवापूर कृती समितीने केली आहे. संबंधित प्रकरणाची दखल न घेतल्यास
रस्त्यावर उतरण्याचा इशारा कृती समितीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम (SANJAY KADAM) यांना दिला आहे. टोल नाका हटाव कृती समिती प्रचंड आक्रमक झाली असून कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरू शकते अशी माहिती प्राथमिक माहिती मिळत आहे. तीन वर्षापुर्वी देखील आंदोलन करण्यात आलं होतं. पण मागण्यांसंदर्भात केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं.
कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरण्याचा इशारा
पुणे सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर एम एच 12 आणि एम एच 14 या वाहनांची टोलमाफी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर पुणे सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाची कामे पूर्ण झाल्याने ही टोलमाफी बंद केली आहे. 1 मार्च पासून या वाहनांना टोल आकारण्यात येत असल्याची माहिती,एनएचएआयकडून सांगण्यात देण्यात आली आहे. पुणे सातारा रस्त्याच्या रुंदीकरणाची रखडलेली कामे वेळेत पूर्ण करावी. खेड शिवापूर टोलनाका ‘पीएमारडीए’च्या हद्दीबाहेर हलविण्यात यावा. या मागणीसाठी खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीच्या वतीने तीन वर्षांपूर्वी आंदोलन करण्यात आले होते.त्यावेळी या मागण्यांसंदर्भात केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत हवेली पुणे शहर पिंपरी चिंचवड, भोर, वेल्हा, मुळशी आणि पुरंदर या पाच तालुक्यातील वाहनांना टोलमाफी देण्यात येईल, असे लेखी आश्वासन एनएचएआयकडून देण्यात आलं होतं.
मात्र 1 मार्च 2022 टोल आकारण्यास सुरूवात झाल्याने कृती समिती आक्रमक
तेव्हापासून खेड शिवापूर टोल नाक्यावर या पाच तालुक्यातील वाहनांना टोल आकारण्यात येत नव्हता. मात्र 1 मार्च 2022 पासून खेड-शिवापूर टोल नाक्यावर एम.एच.12 आणि एम.एच.14 या वाहनांना टोल आकारण्यास सुरुवात केली आहे. खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समिती, खेड-शिवापूर टोलनाका पीएमारडीए हद्दीबाहेर हलविण्याच्या मुद्द्यावर ठाम आहे. त्या संबंधिचं पत्र कृती समितीकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांना निवेदन देण्यात आलं आहे.टोलनाका स्थलांतराची प्रक्रिया सुरू करावी अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा कृती समितीकडून देण्यात आलाय.