यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी शरद पवार प्रीतीसंगमावर

| Updated on: Nov 25, 2024 | 10:57 AM

Sharad Pawar Rohit Pawar Ajit Pawar at Karad Pritisangam : यशवंतराव चव्हाण यांचा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित शरद पवार यांनी प्रीतीसंगमावर जात अभिवादन केलं. त्यानंतर अजित पवार हे देखील प्रीतीसंगमावर गेले होते. त्यांनीही अभिवादन केलं आहे. वाचा सविस्तर...

यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन करण्यासाठी शरद पवार प्रीतीसंगमावर
शरद पवार
Image Credit source: Facebook
Follow us on

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा 40 वा आज स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त शरद पवार यांनी कराडमधील प्रीतीसंगमावर जात अभिवादन केलं. यावेळी शरद पवार यांच्यासोबत रोहित पवार आणि निलेश लंके देखील होते. यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रीतीसंगमावर सुरू असलेल्या भजन कार्यक्रम आयोजित केला आहे. शरद पवार आणि रोहित पवार हे देखील काही काळ स्थिरावले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केलं. पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी अभिवादन केलं. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या बैठकीला देखील शरद पवार उपस्थित होते. वेणुताई चव्हाण हॉल या ठिकाणी छोटेखानी बैठक झाली. अजित पवार यांनी देखील प्रीतीसंगमावर जात यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना अभिवादन केलं.

मविआच्या नेत्यांसोबत शरद पवार प्रीतीसंगमावर

साताऱ्यातील कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांचं स्मृतिस्थळ आहे. तिथं जात शरद पवार यांनी अभिवादन केलं आहे. यावेळी श्रीनिवास पाटील, निलेश लंके, बाळासाहेब पाटील, रोहित पवार, विकास लवांडे यांच्यासह इतर स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शरद पवार यांच्यासोबत होते.

शरद पवार यांची फेसबुक पोस्ट

फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं आहे. आपल्या आधुनिक विचारांनी पुरोगामी महाराष्ट्राची पायाभरणी करणारे, महाराष्ट्राला कृषी, शिक्षण व औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर बनवण्यााठी बहुमोल योगदान देणारे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांना पुण्यतिथी दिनानिमित्त विनम्र अभिवादन!, असं शरद पवार यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री राहिले आहेत. 1 मे 1960 महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचीच निवड झाली. देशाचे उपपंतप्रधान म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे. पेशाने वकील असणारे यशवंतराव यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपला ठसा उमटवला. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून यशवंतराव चव्हाण यांचा लौकिक आहे. यशवंतराव चव्हाण यांना साहित्याची आवड होती. युगांतर, सह्याद्रीचे वारे, कृष्णाकाठ, ऋणानुबंध ही त्यांची साहित्यसंपदा आहे.