बीड: पूजावर बँकेचं कर्ज होतं. त्यामुळे ती टेन्शनमध्ये होती आणि त्यातच बँकेने कर्जाचा तगादा लावला होता, असं पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी म्हटलं होतं. मात्र, कर्जाचे हप्ते भरण्यासाठी बँकेने पूजावर कोणताही तगादा लावला नसल्याचं स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पूजाच्या आत्महत्येचा गुंता अधिकच वाढला आहे. (sbi bank never sent notice to pooja chavan for emi)
पूजा चव्हाणने बीडच्या गांधी मार्केट परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून पोल्ट्री व्यवसायासाठी साडे तेरा लाखाचं कर्ज घेतलं होतं. बँकेने 2018मध्ये पूजाला कर्ज मंजूर केलं होतं. तिला दोन लाखांची सबसीडीही देण्यात आली होती. कर्जासाठी तिने परळीतील घर आणि वसंत नगर तांड्यातील एक एकर शेती तारण म्हणून ठेवली होती. तिला दरमहिन्याला 35 हजार 500 रुपयांचा हप्ता भरावा लागत होता. तिने कर्जाचे 12 हप्तेही भरले होते. मात्र, लॉकडाऊनच्या काळात तिला कर्जाचे हप्ते भरता आले नव्हते. पूजाला कर्जाचे हप्ते भरता आले नसले तरी बँकेकडून हप्त्यांसाठी तिला कोणताही तगादा लावण्यात आलेला नव्हता. तिला नोटीसही पाठवण्यात आली नव्हती, असं एसबीआयने स्पष्ट केलं आहे. मात्र, एसबीआयच्या या अधिकाऱ्याने कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
गूढ वाढलं
बँकेचं कर्ज असल्याने पूजा तणावात होती. बँकेकडून कर्जाबाबत तिला सतत विचारणा करण्यात येत होती. त्या टेन्शनमुळेच तिचा मृत्यू झाला असल्याचं पूजाचे वडील लहू चव्हाण यांनी म्हटलं होतं. मात्र, बँकेच्या खुलाश्यानंतर पूजाच्या मृत्यूचं गूढ वाढलं आहे. पूजाचे वडील वारंवार तिचा मृत्यू टेन्शनमुळे झाल्याचं सांगत आहेत. आम्ही पोलिसांना आधीच स्टेटमेंट दिलं असून पोलीस व्यवस्थित तपास करत असल्याचंही लहू चव्हाण सांगत आहेत. तर पूजाचे आजोबा मात्र या प्रकरणाची सीआयडी मार्फत चौकशी करण्याची मागणी करत आहेत. तसेच पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी पूजाच्या दोन मित्रांना अटक करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे पूजाच्या कुटुंबातच पूजाच्या मृत्यूबाबत दोन मते असल्याचं दिसून आल्याने पूजाच्या मृत्यूबाबतचं गूढ अधिकच वाढलं आहे.
काय म्हणाले होते लहू चव्हाण?
पूजाने पोल्ट्री व्यवसायासाठी 25 ते 30 लाखांचं कर्ज घेतलं होतं. पण लॉकडाऊनमुळे धंद्यात खोट आल्याने ती टेन्शनमध्ये होती, असं सांगत कर्जाच्या टेन्शनमुळे पूजाने आत्महत्या केल्याचे संकेतही त्यांनी दिले होते. तिच्यावर 25-30 लाखांचं कर्ज होतं. पप्पांचं चांगलं व्हावं म्हणून तिने तिच्या नावावर कर्ज घेतलं होतं. तिला पोल्ट्री काढायची होती. आम्ही बांधकाम केलं. बॅच टाकला. पण कोरोना आल्यामुळे आम्ही सर्वांना कोंबड्या फूकट वाटल्या. पोल्ट्रीतून आम्हाला एक रुपयाही आला नाही. सरकारला मदतीसाठी अर्ज दिला. मदतही मिळाली नाही. नंतर बर्ड फ्लू आला. त्यातही नुकसान झालं. त्यामुळे तिच्यावर संकट उभं राहिलं होतं. तेव्हा मी तिला बेटा घाबरू नको, माझी 25 लाखाची एलआयसी आहे. त्यावरून लोन घेऊ म्हणून सांगितलं. एलआयसीवर मला चार-पाच लाखाचं लोनही मिळालं. त्यानंतर एक दिवस पूजा म्हणाली गावाकडे मन लागत नाही. पुण्याला जाते. जाताना मी तिला 25 हजार रुपये खर्चाला दिले होते, असं त्यांनी सांगितलं होतं. तिच्यावर कर्जाचा ताण होता. हप्ते भरण्याचं टेन्शन होतं, असंही ते म्हणाले होते. (sbi bank never sent notice to pooja chavan for emi)
VIDEO : माझ्या मुलीची बदनामी थांबवा, पूजाच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया#poojachavan #PoojaChavanSuicide pic.twitter.com/yQa19usY2S
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 14, 2021
संबंधित बातम्या:
आमची बदनामी बंद करा, नाही तर मी आत्महत्या करेन; पूजाच्या वडिलांचा आक्रोश
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप, चित्रा वाघांना धमकीचे फोन
(sbi bank never sent notice to pooja chavan for emi)