सर्वात मोठी बातमी ! बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर बस धडाधडा पेटली, बसमधील 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू; अनेकजण जखमी

| Updated on: Jul 01, 2023 | 7:22 AM

बुलढाण्यात अत्यंत भीषण अपघात झाला आहे. नागपूरहून पुण्याला जाणारी खासगी बस समृद्धी महामार्गावर पलटी झाली. त्यानंतर या बसला आग लागली. आगीने भराभर पेट घेतल्याने या बसमधून प्रवास करणाऱ्या 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे.

सर्वात मोठी बातमी ! बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर बस धडाधडा पेटली, बसमधील 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू; अनेकजण जखमी
Follow us on

बुलढाणा : बुलढाण्यात अत्यंत भीषण अपघात झाला आहे. नागपूरहून पुण्याला जाणारी खासगी बस समृद्धी महामार्गावर पलटी झाली. त्यानंतर या बसला आग लागली. आगीने भराभर पेट घेतल्याने या बसमधून प्रवास करणाऱ्या 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. ही आग भीषण होती. आगीमुळे बसचा अक्षरश: कोळसा झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्यास सुरुवात केली.

ही खासगी बस नागपूरहून पुण्याला जात होती. रात्री 1 ते दीडच्या सुमारास हा अपघात झाला. मध्यरात्री समुद्धी महामार्गावरील सिंदखेड राजा जवळील पिंपळखुटा गावात अचानक बस पलटी झाली. त्यानंतर बसला आग लागली आणि बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केलं. बस पलटी झाल्याने प्रवाशांना बसमधून बाहेर पडता येत नव्हतं. बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग उरला नव्हता. अनेक प्रवासी बाहेर पडण्यासाठी धडपडत होते. किंचाळ्या, आक्रोश सुरू होता, पण त्यांना बाहेर पडता येत नव्हतं. आग मोठी असल्याने इतरांनाही त्यांना बाहेर काढणं शक्य नव्हतं. त्यामुळे या बसमधील 25 प्रवाशांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. तर चालकासह चारजण या अपघातातून बचावले आहेत. या बसमधून 30 प्रवाशी प्रवास करत होते.

हे सुद्धा वाचा

या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलीस यंत्रणा, महसूल विभाग, ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्यास सुरुवात केली. या सर्वांनी तात्काळ बचावकार्य सुरू करत आठ जणांचे प्राण वाचवले. तसेच बसमधील 20 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. या सर्व मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

कसा झाला अपघात?

सिंधखेडराजा येथील पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर ही बस डिव्हायडरवर आदळली. त्यामुळे बस पलटी झाली आणि बसला अचानक आग लागली. त्यामुळे ही बस पूर्णपणे जळून खाक झाली. बसमधील 25 प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू झाला. अपघात झाला तेव्हा बहुतेक सर्व प्रवासी झोपेत होते. त्यामुळे नेमकं काय झालं हेच त्यांना कळलं नाही, असं सूत्रांनी सांगितलं.

प्रत्यक्षदर्शींच्या मते समृद्धी एक्सप्रेसवेवर डाव्या बाजूला बस लोखंडी खांबाला धडकली. त्यानंतर बस अनियंत्रित जाली अन् डिव्हाडरला जाऊन धडकली. त्यामुळे बस पलटली. त्यामुळे बसचा दरवाजा खाली पडला. त्यामुळे बाहेर पडण्याचा मार्गच बंद झाला. काही प्रवाशी खिडक्या तोडून बाहेर पडले म्हणून ते वाचले. बाकीच्या प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.