BJPनं मुहूर्त काढणारा नेता बदलावा, Shambhuraj Desai On Chandrakant Patil

BJPनं मुहूर्त काढणारा नेता बदलावा, Shambhuraj Desai On Chandrakant Patil

| Updated on: Feb 13, 2022 | 5:20 PM

10 मार्चनंतर महाराष्ट्रातील सरकार पडणार या चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्या विधानाची शंभुराजे देसाई (Shambhuraj Desai) यांनी खिल्ली उडविली आहे. आता भाजपाने (BJP) महविकास आघाडी सरकार पडण्याचा मुहूर्त काढणारा नेता बदलावा, असा टोला लगावला आहे.

10 मार्चनंतर महाराष्ट्रातील सरकार पडणार या चंद्रकांतदादा पाटील (Chandrakant Patil) यांच्या विधानाची शंभुराजे देसाई (Shambhuraj Desai) यांनी खिल्ली उडविली आहे. आता भाजपाने (BJP) महविकास आघाडी सरकार पडण्याचा मुहूर्त काढणारा नेता बदलावा, असा टोला लगावला आहे. आघाडी सरकार स्थापनेपासून दोन वर्षात भाजपाने अनेक मुहूर्त सांगितले. मात्र सरकार इंचभरही हलले नाही आणि इथून पुढेही हलणार नसल्याचा विश्वास व्यक्त केला. कितवा मुहूर्त आहे हा, असा सवाल यावेळी देसाई यांनी केलाय. खेडेगावात लोक चांगला मुहूर्त काढण्यासाठी ज्योतिषाकडे जातात. आता भाजपाने मुहूर्त काढणारा नेताच बदलावा. कारण पुढचे दहा वर्षही सरकार बदलणार नाही. महाविकास आघाडीचे सरकार भक्कम आहे. इंचभरही ते हलणार नाही, असा विश्वास शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.