Rohini Khadse : ‘उगाचच उचलली जीभ लावली…’ रोहिणी खडसे यांचं चित्रा वाघ यांना सडेतोड प्रत्युत्तर

| Updated on: Mar 22, 2025 | 11:34 AM

Rohini Khadse : 'सध्या शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे आणि भाजप नेत्या आमदार चित्रा वाघ यांच्यात शाब्दीक लढाई सुरु आहे. कुठल्यातरी बिग बॉसला खुश करण्यासाठी उणी-दुणी काढायची, अशी टीका रोहिणी खडसेंनी चित्रा वाघ यांच्यावर केली. त्यावर चित्रा वाघ यांनी, 'त्याचे वडिल माझ्यासमोर बसतात. ते जास्त चांगल सांगतील काय आहे ते' असं उत्तर दिलं. आता पुन्हा रोहिणी खडसे बोलल्या आहेत.

Rohini Khadse : उगाचच उचलली जीभ लावली... रोहिणी खडसे यांचं चित्रा वाघ यांना सडेतोड प्रत्युत्तर
Chitra Wagh-Rohini Khadse
Image Credit source: Tv9 Marathi
Follow us on

भाजप नेत्या, आमदार चित्रा वाघ यांच्यावर सध्या चौफेर हल्ले सुरु आहेत. दिशा सालियान मुद्द्यावरून विधिमंडळात त्यांच्यामध्ये आणि अनिल परब यांच्यात जोरदार शाब्दिक द्वंद रंगलं होतं. त्यावेळी चित्रा वाघ यांनी, परब यांना मी तुमच्या सारखे 56 पायाला बांधून फिरते, असं म्हंटलं होतं. त्यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून चित्रा वाघ यांना टार्गेट केलं जात आहे. शरद पवार गटाच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर ‘बिग बॉस’ रिएलिटी शो चा संदर्भ देऊन टीका केली. “एका वरिष्ठ सभागृहामध्ये एक महिला एका लोकप्रतिनिधी बाबत असं वक्तव्य करते. त्या सभागृहाची एक गरिमा आहे. त्या गरिमेच्या हिशोबाने तिथे वक्तव्य करणं अपेक्षित आहे” असं रोहिणी खडसे म्हणाल्या.

“कुठेतरी बिग बॉसमध्ये जसं एकमेकांच्या बाबतीत उणी-दुणी काढणार, एकमेकांना गलिच्छ प्रकारे बोलणार, त्यावेळी टीआरपी वाढतो. टीआरपी वाढला की बिगबॉस खुश होतो. इथे असच आहे का? कुठल्यातरी बिग बॉसला खुश करण्यासाठी उणी-दुणी काढायची. एकमेकाच्या अंगावर धावून जायच म्हणजे बिग बॉस खुश होणार. कालचा प्रकार असाच वाटला, यातून निष्पन्न काही झालं नाही. शेतकऱ्यांना काही मिळालं नाही. महिला अत्याचाराबद्दल काही बोलल गेलं नाही. फक्त उणीदुणी काढण्याचा प्रकार होता” अशी टीका रोहिणी खडसे यांनी केली.

‘त्यांचे वडिल माझ्यासमोर बसतात’

त्यावर नंतर चित्रा वाघ यांनी उत्तर दिलं. “रोहिणी खडसेंना बिग बॉस सारख वाटलं का?. त्यांचे वडिल माझ्यासमोर बसतात. ते जास्त चांगल सांगतील काय आहे ते, त्यांना विचाराव ते चांगलं सांगतील” असं चित्रा वाघ म्हणाल्या.


‘हे लक्षात घेऊन बोला’

त्यावर रोहिणी खडसे यांनी पुन्हा एकदा उत्तर दिलं आहे. “माझ्या वडिलांचं नाव घेऊन बोलण्याआधी त्यांच्या गेल्या ४० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीची तरी माहिती घ्यावी ! ते कोण आहेत, भाजप या पक्षासाठी त्यांचं योगदान काय… याची माहिती कृपा करून तुमच्या वरिष्ठ नेत्यांकडून जाणून घ्यावी आणि मग बोलावं…” असं रोहिणी खडसेंनी चित्रा वाघ यांना सुनावलं. “त्यामुळे आपण कुणाबाबत बोलतो हे लक्षात घेऊन बोला… उगाचच उचलली जीभ लावली टाळ्याला नको….” असं चित्रा वाघ यांना सुनावलं.