शरद पवार यांनी मोठी जबाबदारी सोपविली, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रीया काय?

| Updated on: Jun 10, 2023 | 2:29 PM

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्ली येथील बैठकीत पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांची नियुक्ती जाहीर केल्यानंतर या दोन नेत्यांनी काय दिली प्रतिक्रीया..पाहा

शरद पवार यांनी मोठी जबाबदारी सोपविली, प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची पहिली प्रतिक्रीया काय?
patel - sule
Image Credit source: socialmedia
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पुन्हा धक्कातंत्र वापरत दिल्ली येथे पक्षाच्या बैठकीत पुन्हा भाकरी फिरवली आहे. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर त्यांची कन्या सुप्रिया सुळे आणि पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांची संयुक्तपणे नियुक्ती जाहीर केली आहे. राष्ट्रवादी पक्षाची धुरा आता कोणाकडे राहणार याचा फैसला शरद पवार यांनी केल्यानंतर या दोन नेत्यांची पहीली प्रतिक्रिया काय आली आहे ते पाहा…

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्ली येथील बैठकीत पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदावर पक्षाच्या दोन मोठ्या नेत्यांची नियुक्ती जाहीर केल्याने पक्षामध्ये वादळ येणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाले आहे. शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांना संपूर्णपणे साईड लाईन करून पवार यांनी अचानक सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या खांद्यावर कार्यकारी अध्यक्ष पदाचा भार संयुक्तपणे सोपवला आहे. त्यानंतर राजकीय वातावरण गरम झाले आहे.

आजपर्यंत पक्षासाठी करत आलो…पुढेही 

या मोठ्या जबाबदारीनंतर आता पक्षाचे दुसऱ्या फळीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, मी पहिल्यापासून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची जबाबदारी सांभाळत आलो आहे. माझ्यासाठी कुठलीही जबाबदारी साहेबांनी दिली ती मी पार पाडणार, आजपर्यंत पक्षासाठी करत आलो यापुढे करत राहणार असेही त्यांनी सांगितले.

मी मनापासून आभारी

याबाबत सुप्रिया सुळे यांनी ट्वीटरवर प्रतिक्रीया देताना सांगितले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात माझी व प्रफुलभाई पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याबद्दल पक्षसंघटनेची मी मनापासून आभारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेला हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी कटिबद्ध आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हितचिंतक यांचे यापूर्वी उत्तम सहकार्य मिळाले आहे ते यापुढेही कायम राहिल हा विश्वास आहे. या जबाबदारीबद्दल आदरणीय पवार साहेब, पदाधिकारी, ज्येष्ठ नेते आणि कार्यकर्ते आदी सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार’.