मुंबईः एखाद्या शासकीय कार्यालयात जाऊन 125 तासांचं रेकॉर्डिंग करणं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. यासाठी शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिली. मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी विधानसभेत महाविकास आघाडीतर्फे भाजप नेत्यांविरोधात कुभांड रचले जात असल्याचा गंभीर आरोप काल केला. यासाठी त्यांनी तब्बल 125 तासांचं व्हिडिओ फुटेजदेखील (Fadanvis Video Bomb) सादर केलं. या व्हिडिओतील काही धक्कादायक संवाद त्यांनी विधानसभेत सादर केले. या सर्व प्रकाराची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. या व्हिडिओत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचंही नाव आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेल्या व्हिडिओविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, ‘ ज्या काही गोष्टी त्यांनी सांगितल्या त्याच्या खोलात मी गेलो नाही. मी कौतुक वाटलं एका शासकीय अधिकाऱ्याच्या कार्यालयात जाऊन त्याच्या संबंधीत १२५ तासांची रेकॉर्डिंग हे करण्यासाठी फडणवीस किंवा त्यांचे सहकारी यशस्वी झाले ही कौतुकास्पद बाब आहे. 125 तास रेकॉर्डिंग करायचं याचा अर्थ ही प्रक्रिया किती तास चालली असेल याचा हिशोब केला तर ही कौतुकास्पद बाब आहे. 125 तास रेकॉर्डिंग काम करण्याचं काम खरंच असेल तर शक्तीशाली एजन्सीचा वापर केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा एजन्सी या फक्त भारत सरकारकडे आहेत. त्यामुळे राज्यात जाऊन राज्यात जाऊन राज्य सरकारच्या एखाद्या कार्यालयात जाऊन तास न् तास जे काही काम केलं टेप केलं रेकॉर्ड करायला ते यशस्वी झाले
ते खरं आहे की नाही ते सिद्ध झालं पाहिजे.
फडणवीस यांनी सादर केलेल्या व्हिडिओत शरद पवार यांचंही नाव आहे. याविषयी प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, ‘ या संपूर्ण प्रकरणाची राज्य सरकार चौकशी करेल. त्याची सत्यता असत्यता तपासेल. त्यात माझंही नाव घेतलेलं दिसतं. माझं कधी या संबंधात कुणाशी बोलणं व्हायचं कारण नाही. कधी काळी वर्ष सहा महिन्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या सहकाऱ्याबाबत तक्रार आली होती. मी त्यांना कळवली. त्यांना सांगितलं त्यात सत्यता किती तुम्ही पाहा. तुमच्या सहकाऱ्याबाबतची ही तक्रार आहे. एखादी व्यक्ती सार्वनिक जीवनात कार्य करते तेव्हा त्यावर शहानिशा न करता बोलणं योग्य नाही. त्यामुळे मी त्यावर भाष्य करणार नाही. तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर त्यांच्याकडून मला एवढंच कळलं की तुम्ही सांगितलेल्या लोकांच्या तक्रारीत मी लक्ष घातलं. अशा प्रकारच्या गोष्टी होता कामा नयेत याची काळजी घेईल. हा प्रश्न माझ्याबाबत तिथे संपला.’ अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
इतर बातम्या-