माझा एन्काऊंटर कटाच्या मागे शरद पवार की ठाकरे? बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच काय म्हणाले सदावर्ते

| Updated on: Oct 15, 2024 | 9:35 PM

बिग बॉसच्या घरात स्पर्धेक म्हणून गेलेले गुणरत्न सदावर्ते आता घराच्या बाहेर आले आहे. घरात असताना त्यांनी एक मोठा दावा केला होता. आपला एन्काऊंटर करण्याचा कट रचल्याचा आरोपा त्यांनी केला होती. आता घरातून बाहेर आल्यावर काय म्हणाले सदावर्ते जाणून घ्या.

माझा एन्काऊंटर कटाच्या मागे शरद पवार की ठाकरे? बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच काय म्हणाले सदावर्ते
Follow us on

बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून गेल्यामुळे गुणरत्न सदावर्ते चर्चेत आले होते. पण आता बिग बॉसच्या घरातून गुणरत्न सदावर्ते बाहेर आले आहेत. घरातून बाहेर आल्यानंतर ते म्हणाले की, बिग बॉसच्या घरामध्ये मी, माझी पत्नी जयश्री सदावर्ते हिला फार मिस केलं. जयश्री नावात पण जय आहे आणि जय श्रीराम मध्ये पण जय आहे. त्यामुळे मी जय श्रीराम आणि जयश्री आय लव यू असं बिग बॉसच्या घरात म्हणालो. माझा एन्काऊंटर करण्याचा डाव टाकण्यात आला होता. मला संशय की दोन वेळा माझा एन्काऊंटर करण्याचा प्रयत्न झाला पण मी वाचलो आणि या टीव्ही ९ च्या रिपोर्टरचा फार मोठा हात आहे. ऊपकार आहेत.

बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यावर मला जाणीव झाली की मी तीला किती मिस करायचो. मी तिची आल्याबरोबर पप्पी घेतली आणि तिला झप्पी दिली. कोर्टाने जे ताशेरे ओढले ते मी देखील ऐकले त्याला गांभीर्याने घेतलं आणि म्हणूनच मी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलो. ज्यावेळी या सगळ्या सुनावण्या होतील त्यावेळी मी स्वतः बिग बॉसच्या घरात पुन्हा एकदा जाईन.

सलमान खान हा प्रत्येकाच्या मनावर राज करणारा एक अभिनेता आहे आणि मला तो फार आवडला आणि मी ज्या पद्धतीने वागलो हे त्यालाही पटलं. मला केवळ एवढेच म्हणायचे की सुप्रिया सुळे यांनी माझा डायलॉग चोरला आणि म्हणाले की डंके की चोट पर तसेच मी पण बोलतो की डंके की चौट पर चौकशी करा. माझा एन्काऊंटर कटाच्या मागे शरद पवारांचा हात होता की नाही ठाकरेंचा हात होता की नाही ते उघड होईल.

मला एवढंय म्हणायचे की बाबा सिद्धीकी यांच्या हस्तेमागे केवळ बिष्णोई गॅंग आहे असं म्हणणं योग्य नाही पण यामध्ये बिल्डरचा अँगल आहे का ? हे पोलिसांनी तपासावं, शाहिद बनवाचे देखील नाव समोर येत आहे. सलमान खान याने शंकराचार्य यांच्याशी जवळीक वाढवावी बिष्णोई समाज हा मोठा समाज आहे , आता तरी त्यांच्याशी त्यांनी बोलणं सुरू करावं. ये तो सिर्फ शुरूआत है आगे आगे देखो होता है क्या.’