कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये जोरदार फटकेबाजी केलीय. शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनादेखील चांगलेच टोले लगावले. शरद पवार आज कोल्हापूरच्या दौऱ्यावर होते. या दैऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेतून त्यांनी अमित शाह, राज ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. तसेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनाही पवारांनी चिमटा काढला. पवारांनी नारायण राणे यांच्या एका विधानावरुन सत्ताधाऱ्यांनी खडेबोल सुनावलं. त्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या एका विधानावरुन वाद झाला. राज्यपालांना हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलनही झालं. आणि राज्यपालांनीही आपल्याला राज्यपाल बनून काही सुख नसण्याचं म्हटलं. त्यावर पवारांनी राज्यपालांवर टीका केली.
शरद पवारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधला. दोन दिवसांपूर्वी शाहांनी अयोध्येत राम मंदिर कधी होणार याबाबत सांगितलं. त्यावरही पवारांनी निशाणा साधला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून राज्यात जातीवाद सुरु झाला, असं राज ठाकरे वेळोवेळी म्हणाले आहेत. त्यांच्या त्याच वक्तव्याचा पुनरोच्चार मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला. त्यावरही शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं.
राज्यातलं शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचं भाकीत संजय राऊत यांनी केलंय. शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असं विधान राऊतांनी केलं. त्यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली.