अजितदादांना कोणते अधिकार दिले नाहीत? तुम्हीच सांगा; शरद पवार यांचा थेट सवाल

| Updated on: Oct 29, 2024 | 4:11 PM

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज कन्हेरीमधून झाला, यावेळी आयोजित सभेत बोलताना शरद पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

अजितदादांना कोणते अधिकार दिले नाहीत? तुम्हीच सांगा; शरद पवार यांचा थेट सवाल
शरद पवार, अजित पवार
Image Credit source: Facebook
Follow us on

बारामतीमधील कन्हेरी गावातून प्रचाराचा शुभारंभ करण्याची पवार कुटुंबाची पंरपरा आहे. आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ कन्हेरीमधून झाला. यावेळी आयोजित सभेत बोलताना शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अजित पवार यांना कोणते अधिकार दिले नाहीत, तुम्हीच सांगा असा थेट सवाल देखील यावेळी शरद पवार यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार 

ज्यांना सगळ दिलं त्यांनीच पक्ष घेतला आणि दुसरीकडे जाऊन बसले. पक्ष मी काढला अन् मलाच कोर्टात खेचलं, सहा महिन्यांपूर्वीची सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या निवडणुकीच्या वेळी करण्यात आलेली भाषणं आठवा. केंद्रातून चक्र फिरली अन् राष्ट्रवादी त्यांना मिळाली. अजित पवार यांना कोणते अधिकार दिले नव्हते तुम्हीच सांगा असा थेट सवाल शरद पवार यांनी यावेळी केला.

दरम्यान सोमवारी झालेल्या सभेमध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर आरोप केले होते. मी माझी चूक मान्य करतो की मी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना उमेदवारी द्यायला नको होती, मात्र यावेळी मी पहिल्यांदा अर्ज भरणार होतो. आम्ही सगळे तात्यासाहेंबाची फॅमीली आहोत, आईने आधार दिला. आई सांगत होती माझ्या दादांच्या विरोधात फॉर्म भरू नका मात्र तरीही फॉर्म भरला, फॉर्म भरायला कोणी सांगितलं तर म्हणे साहेबांनी मग आमचं घर साहेबांनी फोडलं का? असा सवाल अजित पवार यांनी केला होता. याला देखील शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे.

ज्यांच्या हातात संगळं दिलं होतं, तेच पक्ष घेऊन दुसरीकडे जाऊन बसले, आणि आता म्हणत आहेत की मी घर फोडलं ही मोठी गंमतीची गोष्ट असल्याचा टोला यावेळी शरद पवार यांनी लगावला आहे.