मुंबईः महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारला (Mahavikas Aghadi) कुणी धक्का लावू शकत नाही. सरकार अस्थिर करण्याचे जे प्रयत्न सुरु आहेत, त्यांना तिन्ही पक्ष पाठिंबा देणार नाहीत, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis Sting operation) यांनी विधानसभेत केलेल्या खळबळजनक आरोपानंतर पवार यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडी सरकारकडून भाजप नेत्यांविरोधात कशाप्रकारे कट रचला गेला आणि हा सगळा प्लॅन विशेष सरकारी वकिलांच्या कार्यालयात ठरल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. यासंबंधीचे 125 तासांचे व्हिडिओ फुटेज त्यांनी सादर केले. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र या सर्व चर्चांना फेटाळत सरकारला कुणीही धक्का पोहोचवू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरु आहेत, याविषयी बोलताना शरद पवार म्हणाले, ‘ या सरकारला कुणी धक्का लावू शकत नाही. या सरकारडे स्वच्छ बहुमत आहे. अस्थिर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातून सत्ता कशी मिळवली जाईल याचे प्रयत्न सुरू आहेत. पण या प्रयत्नाला तिन्ही पक्ष पाठिंबा देणार नाही. या पक्षांकडून त्यांना प्रतिसाद मिळणार नाही. महाराष्ट्रातील जी भूमिका आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा सर्वांचाच ईडीचा विरोध आहे. राऊतांची भूमिका आमच्या विचाराशी सुसंगत आहे.
महाराष्ट्रात सातत्याने भाजप विरोधी पक्षांच्या नेत्यांवर आणि त्यांच्या नातेवाईक, स्वकीयांवर धाडसत्र सुरु आहे. असे प्रकार महाराष्ट्रासोबत पश्चिम बंगालमध्येही सुरु आहेत, असं शरद पवार म्हणाले. ते म्हणाले, ‘ एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. महाराष्ट्रात आणि पश्चिम बंगालमध्ये धाडी टाकल्या जात आहे. इथे काही गोष्टी झाल्यावर आमच्याकडेही घडतं असं मला फोन करून सांगितलं. पण आपण याविरोधात लढा देऊ, असं आश्वासन मी दिलं आहे.
नवाब मलिक यांचा दाऊदशी संबंध असल्याचा ठपका भाजपतर्फे ठेवण्यात आला आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ईडीद्वारे नवाब मलिक यांना कोठडी सुनावण्यात आली असून त्यांचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणीही तीव्र होत आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, ‘ मलिकांचा कशासाठी राजीनामा घ्यायचा? जो माणूस 25- 30 वर्ष विधीमंडळात आहे. या वर्षात कधी आरोप केला नाही. आता करत आहे. एखादा मुस्लिम कार्यकर्ता असला तर तो दाऊदशी संबंधित ठरवला जातो हे चुकीचं आहे. आम्ही मलिकांच्या पाठिशी आहोत,’ अशी ठाम भूमिका शरद पवार यांनी घेतली.
इतर बातम्या-