मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी : अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने साईबाबांच्या चरणी अर्पण केलेले मुकूट सोन्याचे नसून, चांदीचे असल्याचे उघड झाले आहे. चांदीच्या मुकुटाला सोन्याचा मुलामा दिला होतं. शिल्पा शेट्टीने 16 नोव्हेंबर रोजी शिर्डीला जाऊन साईंचं दर्शन घेतलं. यावेळी तिने 800 ग्रॅम वजनी सोन्याचा मुकूट साईचरणी अर्पण केल्याची माहिती दिली गेली. मात्र, मुकूट सोन्याचे नसून, चांदीचे आहे आणि त्याला केवळ सोन्याचा मुलामा दिल्याचे आता उघड झाले आहे.
साई संस्थानने काय माहिती दिली?
शिल्पा शेट्टीने दिलेला मुकूट चांदीचा असून, त्याला सोन्याचा मुलामा दिलेला आहे. मुल्यांकन केल्यावर मुकूट चांदीचा असल्याचं आलं समोर आलं. मुकुटाची किंमत 22 हजार रुपये आहे.” अशी माहिती साई संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी दिली.
मात्र, शिल्पा शेट्टींनी दिलेल्या दानाचा संस्थानने नम्रपणे स्वीकार केला असून, काय आणि किती दान द्यावं ही भक्तांची श्रद्धा असते. शिवाय, शिल्पा शेट्टींनीही मुकूट सोन्याचा की चांदीचा असल्याचा केला नव्हता, असेही चंद्रशेखर कदम यांनी नमूद केले.
शिल्पा शेट्टीकडून साईचरणी मुकूट अर्पण
अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सहकुटुंब 6 नोव्हेंबर रोजी शिर्डीच्या साई बाबांच्या दरबारी हजेरी लावली. बाबांच्या धुपारतीला हजेरी लावत, सर्वांनी साई समाधीचे दर्शन घेतले. शिल्पा शेट्टीसोबत पती राज कुंद्रा, आई, मुलगा आणि बहीण शमिता शेट्टी हे यावेळी उपस्थित होते.
यावेळी शिल्पाने साईबाबांना 800 ग्रॅम सोन्याचा मुकूट अर्पण केला, अशी माहिती समोर आली होती. या मुकूटाची किंमत अंदाजे 25 लाख रुपयांच्या आसपास असल्याचेही बोलले जात होते. मात्र, हे मुकूट चांदीचे असून, केवळ 22 हजारांचे असल्याचे आता उघड झाले आहे.
शिल्पा शेट्टी शिर्डीच्या साईबाबांची निस्सीम भक्त असून, ती वर्षातून किमान एकदातरी साईदर्शनासाठी आवर्जून शिर्डीत येते. शिल्पाच्या विनंतीवरुन बाबांना अर्पण केलेला सुवर्णमुकूट साईबाबांच्या मूर्तीला काही वेळ परिधान करण्यात आला. त्यानंतर साईबाबांच्या धुपारतीतही शिल्पाने संपूर्ण परिवारासह उपस्थिती दर्शवली.