उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ‘गद्दार’ म्हणणारा कुणाल कामरा किती कोटीचा मालक?

| Updated on: Mar 24, 2025 | 3:31 PM

Kunal Kamra Comedian: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्हिडीओमुळे राजकारणात खळबळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना 'गद्दार' म्हणणाऱ्या कुणाल कामरा याची संपत्ती जाणून व्हाल थक्क..., सर्वत्र कुणालची चर्चा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणणारा कुणाल कामरा किती कोटीचा मालक?
Follow us on

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका व्हिडीओमुळे राजकारणात खळबळ माजली आहे. कुणालने स्टँडअप कॉमेडीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना गद्दार म्हटलं असून शिंदे शिवसेना गटाची खिल्ली उडवली आहे. सध्या कुणालचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी तोडफोड करण्यात आली आणि त्याच्यावर कारवाईचीही मागणी करण्यात आली आहे.

कुणाल याने तयार केलेली कवीता…

“थाने की रिक्षा, चेहरे पे दाढी, आँखो में चष्मा.. हाये एक झलक दिखलाए कभी, गुवाहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो, गद्दार नजर वो आए मंत्री नहीं वो दलबदलू है, और कहा क्या जाए जिस थाली में खाए, उसमे ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडणवीस की गोदी मे मिल जाए तीर कमान मिला है इसको, बाप मेरा ये चाहें

कोण आहे कुणाल कामरा?

कुणाल कामरा याचा जन्म 3 ऑक्टोबर 1988 रोजी झाला आणि व्यवसायाने तो एक भारतीय स्टँडअप कॉमेडियन आहे. राजकारण, कॅब ड्रायव्हर्स, बॅचलर लाइफ आणि टीव्ही जाहिराती यावरील विनोदांनी कुणाल सर्वात प्रसिद्ध झाला. कुणाल याने पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण सोडलं आणि प्रसून पांडेंच्या ॲड फिल्म प्रॉडक्शन हाऊस कॉरकोइस फिल्म्समध्ये प्रॉडक्शन असिस्टंट म्हणून काम करायला सुरुवात केली. त्याने तिथे 11 वर्षे काम केले.

हे सुद्धा वाचा

केव्हा पासून केली कॉमेडीला सुरुवात?

कुणालने 2013 मध्ये मुंबईतील कॅनव्हास लाफ क्लबमध्ये एक स्टँड-अप कॉमेडियन म्हणून सुरुवात केली. 2017 मध्ये, YouTube वर अपलोड केलेल्या त्याच्या एका शोच्या क्लिपमुळे कुणाल याला जीवे मारण्याच्या धमक्या मिळू लागल्या. त्याने जुलै 2017 मध्ये रमित वर्मासोबत ‘शट अप या कुणाल’ हा स्वतःचा टॉक-शो सुरू केला. कुणाल याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

कुणाल कामरा याची नेटवर्थ

कुणाल याच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, त्याची नेटवर्थ जवळपास 2 मिलियन डॉलर म्हणजे 17 कोटी रुपये आहे. त्याने संपूर्ण संपत्ती स्टँड-अप कॉमेडी टूर, सोशल मीडिया आणि पॉडकास्ट ‘शट अप या कुणाल’ द्वारे कमावली आहे.