‘मविआ’तील राष्ट्रवादी अन् शिवसेनेत वादंग, ठाकरेंचे शिवसैनिक राजीनाम्याच्या पवित्र्यात?

| Updated on: Sep 22, 2024 | 1:11 PM

महाविकास आघाडीच्या जागावाटपात भोसरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्यात जमा आहे. याची कुणकुण लागल्याने ठाकरे गटातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. भोसरीतील शिवसैनिकांनी गुप्त बैठक घेत तुतारीचा प्रचार न करण्याचा ठराव केला आहे.

मविआतील राष्ट्रवादी अन् शिवसेनेत वादंग, ठाकरेंचे शिवसैनिक राजीनाम्याच्या पवित्र्यात?
sharad pawar uddhav thackeray
Follow us on

विधानसभा निवडणुकीतील जागा वाटपापूर्वी महाविकास आघाडीतील वाद समोर येत आहे. श्रीगोंद्यात परस्पर उमेदवार जाहीर केल्याबद्दल संजय राऊत यांना शरद पवार यांनी फटकारले होते. त्याला संजय राऊत यांनीही प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता पुण्यातील भोसरी विधानसभेचा वाद समोर आला आहे. भोसरीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीविरोधात स्थानिक शिवसैनिक आक्रमक झाले आहे. भोसरीत तुतारीचा प्रचार करणार नाही, असा निर्णय ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी घेतला आहे. त्यासाठी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.

काय आहे शिवसैनिकांची मागणी

भोसरी विधानसभा मतदार संघ शिवसेनाला मिळाला पाहिजे, अशी मागणी शिवसैनिकांनी केली आहे. हा मतदार संघ शिवसेना ठाकरे गट म्हणजे मशालला सुटला नाही तर आम्ही तुतारीचा प्रचार करणार नाही, असा एकमुखी ठराव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केला आहे. गरज पडल्यास त्यासाठी पदांचे राजीनामे देऊ, असा इशारा ही देण्यात आल्याची माहिती विश्वासू सूत्रांनी दिली आहे.

आधी मातोश्रीवर निरोप पाठवू…

महाविकास आघाडीच्या जागावाटपात भोसरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्यात जमा आहे. याची कुणकुण लागल्याने ठाकरे गटातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. भोसरीतील शिवसैनिकांनी गुप्त बैठक घेत तुतारीचा प्रचार न करण्याचा ठराव केला आहे. तसेच आम्ही राजीनामे ही देऊ, अशी भूमिका घेतला. परंतु या प्रकरणाची माहिती आताच माध्यमांमध्ये बोलायला नको. आधी आपला निरोप मातोश्रीवर जायला हवा, अशी भूमिका या शिवसैनिकांनी घेतल्याचे बोलले जाते आहे.

हे सुद्धा वाचा

महाविकास आघाडीत जागा वाटपापूर्वीच वेगवेगळे दावे केले जात आहे. अनेक ठिकाणी स्थानिक कार्यकर्ते जागांसाठी आग्रही आहेत. विदर्भात काँग्रेसला जास्त जागा हव्या आहेत, तर मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेला जास्त जागा हव्या आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी हे दावे-प्रतिदावे रंगत आहेत. यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांसाठी जागे वाटपाचा तिढा सोडवणे अवघड होऊ लागले आहे.