औरंगाबाद : शिवसेना नेते तथा आमदार अंबादास दानवे यांचे औरंगाबादेत मोठे प्रस्थ आहे. त्यांना माणणारा एक मोठा वर्ग या जिल्ह्यात आहे. दानवे यांची राजकारणात जशी वेगळी ओळख आहे, अकदी तशाच पद्धतीने त्यांना सामाजिक जीवनात ओळखलं जातं. दानवे अडल्या नडलेल्यांना जमेल तशी आणि जमेल तिथं मदत करतात. सध्या तर त्यांनी स्वत:च्या गाडीतील प्रथमोपचार पेटी बाहेर काढत एका अपघात झालेल्या सायकलस्वारावर प्रथमोपचार केले आहेत.
गुरुवारी (24 नोव्हेंबर) सुमारे सहा ते सातच्या दरम्यान अंबादास दानवे यांनी एका सायकलस्वारावर स्वत:च्या हाताने प्रथमोपचार केला. एका अज्ञात वाहनाने धक्का दिल्यानंतर हा सायकलस्वार खाली पडला होता. या अपघातामध्ये त्याच्या डोक्याला चांगलीच इजा झाली होती. यावेळी अंबादास दानवे पुण्याकडे त्यांच्या कारने निघाले होते. ही बाब निदर्शनास आल्यानंतर दानवे यांनी तत्काळ गाडी थांबवली तसेच त्यांनी अपघातग्रस्त सायकलस्वाराची विचारपूस करुन त्याच्यावर प्रथमोपचार केले. क्षणाचाही उशीर न करता त्यांनी आपल्या कारमधील प्रथमोपचार पेटी बाहेर काढत सायकलास्वाराच्या जखमेवर आपुलकी आणि जिव्हाळ्याची फुंकर घातली.
काल रात्री पुण्याकडे जात असताना एक सायकल चालकाला अज्ञात वाहनाने धडक दिली. यामध्ये तो जखमी झाला. त्याला तातडीने गाडीतील प्रथमोपचार पेटी उघडून त्याच्या जखमेवर फुंकर घातली. विनंती आहे वाहनचालकांना की रस्त्यावर चालताना इतरांचाही थोडा विचार करा. #pune #highway #accident #FirstAid pic.twitter.com/yJNEcoqLxm
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 24, 2021
हा प्रसंग दानवे यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर कालय. यावेळी त्यांनी प्रथमोपचार करतानाचे फोटोसुद्धा शेअर केले आहेत. विशेष म्हणजे त्यांनी वाहने सावकाश चालवा, इतरांचाही विचार करा असे लोकांना आवाहन केले आहे. यापूर्वीदेखील दानवे यांची लोकाभिमूखता जनतेला दिसली होती. त्यांनी कोरोनाकाळात बाजारपेठा लवकर बंद होत असताना रहदारी झाल्यामुळे स्वत: रस्त्यावर उतरुन रस्ता मोकळा करण्यास मदत केली होती.
बाजारपेठा ४ वाजता बंद होणार असल्याने बाजारात वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक पोलीस बांधवांच्या मदत म्हणून आज क्रांती चौकात शिवसैनिकांसह सेवा बजावली आणि वाहतूक सुरळीत करून दिली. #shivsena #sambhajinagar pic.twitter.com/31u8PP6pJE
— Ambadas Danve (@iambadasdanve) June 28, 2021
इतर बातम्या :
केंद्राचा वीज क्षेत्राच्या खासगीकरणाचा डाव हाणून पाडा, ऊर्जामंत्री नितीन राऊतांचा हल्लाबोल
परमबीर सिंह यांचा जबाब नोंदवला, उद्या पुन्हा चौकशीसाठी हजर व्हावे लागणार ?