‘गणपत गायकवाडांनी गोळ्या का घातल्या याची चौकशी होणार की नाही?’, उद्धव ठाकरे यांचा सवाल

| Updated on: Feb 04, 2024 | 5:16 PM

भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी केलेल्या गोळीबाराच्या घटनेवरुन उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. गणपत गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्याची वेळ का आली, याचा तपास होणार की नाही? असा सवालही त्यांनी केला आहे.

गणपत गायकवाडांनी गोळ्या का घातल्या याची चौकशी होणार की नाही?, उद्धव ठाकरे यांचा सवाल
Follow us on

सिंधुदुर्ग | 4 फेब्रुवारी 2024 : “भाजप आमदार गणपत गायकवाड यांचं सीसीटीव्ही फुटेज कसं बाहेर आलं? कुणी मागणी केली होती? गणपत गायकवाडांनी गोळ्या का घातल्या याची चौकशी होणार की नाही? गणपत गायकवाडांनी सांगितलं मिंदेनीच मला गुंड बनवलं. गायकवाडांचं स्टेटमेंट आहे. मी बाप म्हणून गोळीबार केलं असं सांगितलं. माझे करोडो रूपये मिंदेकडे आहेत, असं गणपत गायकवाडांनी सांगितलं. आता पाहूया मोदी गँरटी कुणाला पावते मिंदेला कि भाजपच्या आमदाराला पावते हे पाहू”, असं शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांची कुडाळ येथे सभा पार पडली. यावेळी त्यांनी कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबाराच्या घटनेवर जाहीर भूमिका मांडली.

“गोळीबार झाला त्याचं लगेच सीसीटीव्ही बाहेर आलं. ते कोणीही न मागता बाहेर आलं. त्याची गरज नव्हती. तरीही सीसीटीव्ही आलं. मी गायकवाड यांची बाजू घ्यायला आलेलो नाही. तर त्याने बोललं काय ते पाहा. माझे करोडो रुपये त्यांच्याकडे आहेत, असं गणपत गायकवाड म्हणतायत. आता मोदी गॅरेंटी किती तारतेय ते बघू. मोदीजींना एकच सांगायचं आहे, आम्ही तुमचे शत्रू नव्हतो. तुम्ही आम्हाला दूर टाकलंत. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. मोदी साहेब तुमची पिलावळ आहे. ती व्यवस्थित काम करत असतील तर तुम्हाला दुसऱ्यांची गरज पडली नसती”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘सरकारमध्ये गँगवॉर’, ठाकरेंची टीका

“मुंबईमध्ये गँग वॉर सुरु होता युतीने ते हाणून पाडले. पण आता या सरकारमध्ये गँगवॉर दिसत आहे. एकी दिसेच ना कारण ते 70 हजार कोटींच्या खाली आहे. इथला गद्दार तुम्ही घेतला. भेकड माणूस, इथल्या भेकड माणसांना घेऊन तुम्ही पार्टी करताय? तुम्ही त्यांना काय म्हणता काय ते टरबूज पण आता त्याचा झालाय चिराट. तुम्ही मी आजारी असताना हुडी घालून जे जात होता त्याचा परिणाम तुमच्या पक्षावर झालाय. माझा पक्ष उलट वाढत जातोय. एवढं ऊन असून आलात. आज एवढ्या उन्हात आलेला आहात आजचा कोंबडी चोराचा नाहीतर कोंबडी वड्याचा वार आहे. माझा पक्ष उलट वाढत जातोय. हे माझं वडिलोपार्जित कवच आहे. मी घराणेशहीचे कवच घेऊन बाहेरून पडलो आहे. मला घराणेशाहीची गरज नाही. तुम्ही चिराटासारखे पडले आहात”, अशी टीका ठाकरेंनी केली.

‘मला कुठं माहिती तिकडे कोंबड्यांचा कारखाना ठेवलाय’

“मी अगोदर एक मेडिकल कॉलेजला परवानगी दिली. त्याअगोदर देखील एका मेडिकल कॉलेजला परवानगी दिली. मी खरी परवानगी दिली. पण मला कुठं माहिती तिकडे कोंबड्यांचा कारखाना ठेवलाय”, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. “अजून निवडणूक बाकी आहे. पण मी तुम्हाला भेटायला आलोय. निवडणुकीला देखील येईन आणि विजयी गुलाल उधळायला पण मी इथेच येईल. मधल्या काळात नौदल दिन साजरा केला. मला बर वाटलं की अटलजींच्या जी गोष्ट लक्षात आलं नाही ते यांच्या लक्षात आलं. ते त्यावेळी आले. येतायत म्हणजे भरघोस घेऊन येतील. पण दिलं तर काहीच नाही. पण पानबुडी प्रकल्प घेऊन गेले. आता महाराष्ट्रात कायम येतायत. पण मला भीती वाटतेय की काहीतरी घेऊन जातील, हे आहे ते आहे दे. तुमचं आयात निर्यात धोरण शेतकऱ्यांच्या जीवावर येतंय”, अशी टीका ठाकरेंनी केली.

उद्धव ठाकरे यांचे भाजप कार्यकर्त्यांना महत्त्वाच्या सूचना

“2014 साली भाजपने चाय पे चर्चा केली. पण आपण होऊ द्या चर्चा कार्यक्रम करायचा आहे. महिलांनी महिलांसोबत आणि पुरुषांनी पुरुषांसोबत चर्चा करायची आहे. मी चक्रीवादळ झाल्यावर आलो होतो तेव्हा केलेली मदत पोहोचली होती की नाही हे विचारा. आता आम्हाला पशवी बहुमताचे सरकार नको म्हणजे नको. 15 लाख रुपये येत आहेत 15 लाख रुपये यायची ना? उज्ज्वला योजना, जलजीवन योजना, मत्स्य संपदा योजना, कोणाला लाभ मिळाला याचा? माझ्या माहितीनुसार याचा सर्वाधिक लाभ गुजरातला मिळाला आहे. 100 स्मार्ट सिटीबद्दल ते बोलले. किती स्मार्ट सिटी केल्या?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.