मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट पडणार? पुढच्या निवडणुका आता स्वतंत्रच? बड्या नेत्याचं धक्कादायक वक्तव्य

| Updated on: Nov 27, 2024 | 10:35 PM

ठाकरे गटाने स्वतंत्र लढलं पाहिजे, असं कालच्या बैठकीत प्रत्येकाचा सूर असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याच्या भावना व्यक्त केल्याचंही दानवे म्हणाले आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीत फूट पडणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट पडणार? पुढच्या निवडणुका आता स्वतंत्रच? बड्या नेत्याचं धक्कादायक वक्तव्य
महाविकास आघाडी
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. या निवडणुकीत महायुतीला तब्बल 230 जागांवर यश आलं आहे. तर महाविकास आघाडीला अवघ्या 46 जागांपर्यंत मजल मारता आली आहे. महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सर्वाधिक 20 जागांवर यश मिळालं. त्यापाठोपाठ काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागांवर यश आळं आहे. या पराभवानंतर आता विरोधकांच्या महाविकास आघाडीत फूट पडते की काय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. कारण ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ठाकरे गटाने स्वतंत्र लढलं पाहिजे, असं कालच्या बैठकीत प्रत्येकाचा सूर असल्याचं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. कार्यकर्त्यांनी स्वबळावर लढण्याच्या भावना व्यक्त केल्याचंही दानवे म्हणाले आहेत.

अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले?

“यापुढच्या निवडणुका स्वंतत्रपणे लढल्या पाहिजेत, असा काही लोकांचा निश्चित सूर आहे. मी ते नाकारत नाही. काही नव्हेच, तर बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की, शिवसेनेने स्वतंत्रपणे लढलं पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की, आपण शिवसेना म्हणून स्वतंत्रपणे सर्व ठिकाणी निवडणूक लढली पाहिजे”, असं अंबादास दानवे म्हणाले आहेत.

दानवेंच्या वक्तव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया

अंबादास दानवे यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “निवडणुका कशा लढवायच्या? हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येकाचा असतो. आम्हाला सत्ताधाऱ्यांचा विरोधात लढण्यासाठी जे योग्य असेल ते निश्चितपणे करु. पण हे सगळं अत्यंत वेगळं आणि कल्पनेच्या पलिकडचं आहे”, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

लोकसभेत मविआला चांगलं यश

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रात चांगली कामगिरी केली होती. त्यावेळी महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील 48 पैकी तब्बल 31 लोकसभा जागांवर यश मिळालं होतं. मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची जादू काही चालली नाही आणि त्यांची रणनीती पूर्णपणे फसली. सत्ताधारी महायुतीने निवडणुकीत पुनरागमन करत आपलं वर्चस्व दाखवून दिलं आहे. महायुतीतील मुख्यमंत्री पदाबाबतचा सस्पेन्स अद्याप संपलेला नसला तरी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्रात यावेळी भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.