अनेक छोटे-मोठे रावण घेऊन मोदी यांच्यावर निवडणुका लढवण्याची वेळ…संजय राऊत यांचा हल्ला

| Updated on: Feb 14, 2024 | 10:31 AM

Sanjay Raut on Narendra Modi | अशोक चव्हाण हे सज्जन व्यक्ती होते. परंतु भीती पोटी ते गेले. त्यांनी ही मोठी चूक केली आहे. आमचे 40 लोक पण गेले आहेत. त्यांना भीती दाखवली गेली. आम्ही गेलो नाही. मग आम्हाला तुरुंगात टाकले. आम्ही तुरुंगात जाणे पसंत केले.

अनेक छोटे-मोठे रावण घेऊन मोदी यांच्यावर निवडणुका लढवण्याची वेळ...संजय राऊत यांचा हल्ला
sanjay raut
Follow us on

चंदन पुजाधिकारी, शिर्डी, दि. 14 फेब्रुवारी 2024 | तुम्ही घाबरलेला आहात. तुम्ही लटपटाता आहात. तुम्हाला ४०० पार काय २०० जागा जिंकता येत नाही. एका नांदेडच्या जागेसाठी नरेंद्र मोदी यांना अशोक चव्हाण यांना घ्यावे लागत आहे. त्याच अशोक चव्हाण यांना त्यांनी भ्रष्टाचारी म्हटले होते. देवेंद्र फडणवीस यांना त्यांना डिलर म्हटले होते. संसदेत काढलेल्या श्वेत पत्रिकेत अशोक चव्हाण यांच्या आदर्श घोटाळाचा उल्लेख केला आहे. मोदी यांना तुम्ही राम म्हणतात ना?. मोदी यांना भगवान विष्णूचे १३ वे अवतार तुम्ही म्हणतात ना. परंतु मोदी यांच्यावर अनेक छोटे-मोठे रावण घेऊन २०२४ च्या निवडणुका लढवण्याची वेळ आली आहे. हा त्यांच्यावर काळाने घेतलेला सूड आहे, असा घणाघात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.

संपूर्ण राज्याचा दौरा करणार

माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, संपूर्ण महाराष्ट्रात दौरा करत आहे. आता धाराशिवला पण जात आहे. तसेच आता एकत्रित दौरा सुद्धा काढणार आहे. या दौऱ्यात महाविकास आघाडीतील सर्व पक्ष असणार आहे. त्यात वंचितपण असणार आहे. दौऱ्यांना लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. लहान लहान बैठका घेत आहेत. लोकशाहीची हत्या भाजपने केली. रावणाने सीता पळवली त्याच्या भूमिकेत भाजप आहे.

लोकसभेत दहा जागा जास्त

तुम्ही आमचे कितीही नेते फोडा, परंतु जनता आमच्यासोबत आहे. शिवसेनेने महाराष्ट्रासाठी झोकून दिले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत आमच्या 10 जागा जास्त असतील. माझा हा दौरा म्हणजे ही लोकसभेची तयारी नाही. शिर्डी मतदार संघात काँग्रेसने दावा केला नाही. ज्यांनी दावा केला ते भाजपात गेले.

हे सुद्धा वाचा

मोदी, शहा यांच्यावर शेतकरी नाराज

मोदी आणि शाह लपून बसणार आहेत. कारण शेतकरी त्यांच्यावर खवळले आहेत. स्वामिनाथन यांना भारतरत्न देत आहात. परंतु त्यांच्या शिफारसी लागू करत नाही. आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोललो तर तुम्ही त्याला चिथावणी म्हणतात का? पण याच प्रश्नावर तुम्ही निवडणुका लढविल्या आहेत.

का गेले अशोक चव्हाण

अशोक चव्हाण हे सज्जन माणूस होते. परंतु भीती पोटी ते गेले. त्यांनी ही मोठी चूक केली आहे. आमचे 40 लोक पण गेले आहेत. त्यांना भीती दाखवली गेली. आम्ही गेलो नाही. मग आम्हाला तुरुंगात टाकले. आम्ही तुरुंगात जाणे पसंत केले.