मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र आयोजित करण्यात आले आहे. मातोश्रीवर या बैठकांचे आयोजन करण्यात आले असून पुढील सलग दोन आठवडे या बैठका नियोजित केल्या आहे. पक्षाच्या राज्यस्तरीय स्थितीचा उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहे. राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे यांनी पक्षाची पुन्हा मोट बांधण्यासाठी परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरे हे दिवाळीनंतर राज्यभर दौरा करणार असल्याची माहिती देखील समोर आली होती. त्याच पार्श्वभूमीवर आढावा तर घेतला जात नाहीये ना ? अशी शंका घेण्यास देखील वाव आहे. राज्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्रित पाहणी दौरा करणार असल्याची माहिती समोर येत असतांना उद्धव ठाकरे मात्र मुंबईतच पदाधिकार्यांचे बैठक सत्र आयोजित करत असल्याचे समोर येत आहे.
शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर अनेक दोन गट निर्माण झाले आहेत. एकनाथ शिंदे यांचा एक गट तर उद्धव ठाकरे यांचा एक गट निर्माण झाला आहे.
एकूणच दोन्ही गटाकडून शिवसेना पक्ष आमचाच हा दावा न्यायालयाच्या कक्षेत आहे, 01 नोव्हेंबरला त्यावर सुनावणी देखील होणार आहे.
त्याच दरम्यान शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह कुणाला मिळणार याबाबत स्पष्टता नसतांना दोन्ही गट आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत आहे.
उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपसह शिंदे गटाला ताकदीने भिडण्यासाठी राज्यभराचा पदाधिकारी यांच्याकडून आढावा घेत दौरा करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.
त्याचपार्श्वभूमीवर मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र आयोजित करण्यात आले आहे.
31 ऑक्टोबर पासून या बैठकांना सुरुवात होणार असून 14 नोव्हेंबर पर्यन्त या बैठकांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आली असून मातोश्रीवर त्याबाबतची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचे बोलले जात आहे.