नाशिकः एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडे दोन तृतीयांशपेक्षा जास्त आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे आम्हीच शिवसेना (Shivsena) असून धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळणार, असा दावा शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी केला आहे. नाशिकमधून त्यांनी टीव्ही ९ शी संवाद साधला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह सोडण्याची तयारी सुरु असल्याची माहिती हाती आली आहे. पक्षाचे चिन्ह बदलले तर नवे मिळणारे चिन्ह घराघरात पोहोचवण्याची तयारी ठेवा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय आहे. एकनाथ शिंदे गटातील आमदारांनीदेखील शिवसेना आम्हीच असून धनुष्यबाणाचे चिन्हदेखील आम्हालाच मिळेल असं म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे गटाकडे दोन तृतीयांश आमदारांचं संख्याबळ असल्यानं कायद्यानुसार, आम्हालाच शिवसेनेचं पक्षचिन्ह मिळेल, असा दावा सुहास कांदे यांनी केला. यासाठी त्यांनी देशातील दोन उदाहरणं ही सांगितली. ते म्हणाले, रामविलास पासवान यांना देवाज्ञा झाल्यानंतर त्यांचा मुलगा आणि काका यांच्यात वाद झाले होते. त्यानंतर त्यांच्या पक्षाचं चिन्हच गोठवण्यात आलं होतं. मुलायमसिंग यादव आणि त्यांचा मुलगा अखिलेश यादव यांच्यातही वाद झाले होते. दोन तृतीयांश आमदार अखिलेश यांच्या बाजूने होते. त्यामुळे सायकल हे चिन्ह अखिलेश यांना मिळालं. निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टाचे असे निर्णय आहे. त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला हे चिन्ह मिळेल, असं वक्तव्य सुहास कांदे यांनी केलं.
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे शिवसेना संपली अशी चर्चा आहे. यावर बोलताना सुहास कांदे म्हणाले, आम्हीच शिवसेना आहोत. त्यामुळे शिवसेना संपली असं म्हणता येणार नाही. बाळासाहेबांचेच हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ह पुढे जाणार आहोत. उलट शिवसेना आम्ही वाढवतोयत. शिवसेसा तळागाळापर्यंत पोहोचवत आहोत. म्हणून शिवसेना संपायचा विषयच येत नाही, असं सुहास कांदे म्हणाले.
दरम्यान, धनुष्यबाण शिवसेनेकडेच आहे. कुठेही जाणार नाही. भाजपने माझ्यासोबत बोलणं थांबवलंय. त्यांना 40 भोंगे मिळालेत. त्यांच्याच माध्यमातून ते बोलतायत. आम्ही आजही त्यांना आमचे सहकारी मानतो. आग्रहानं उमेदवाऱ्या दिल्या आहेत. आमच्या जोरावर ते निवडून आले. आता तिकडे गेले. मात्र पुन्हा निवडून येणार नाहीत, हे मी ठामपणे सांगू शकतो, असं वक्तव्य संजय राऊतांनी केलं.