Shivdi Vidhan Sabha : शिवडीचा गड यंदा कोण काबीज करणार? ‘असं’ आहे मतदानाचं गणित

| Updated on: Oct 22, 2024 | 6:34 PM

शिवडी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश हा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात होतो.या मतदारसंघाचं प्रमुख वैशिष्ट म्हणजे या मतदारसंघाने कधीच एका पक्षाच्या बाजूनं कौल दिला नाही.

Shivdi Vidhan Sabha : शिवडीचा गड यंदा कोण काबीज करणार? असं आहे मतदानाचं गणित
Follow us on

शिवडी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश हा दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात होतो.या मतदारसंघाचं प्रमुख वैशिष्ट म्हणजे या मतदारसंघाने कधीच एका पक्षाच्या बाजूनं कौल दिला नाही. या मतदारसंघातून विविध पक्षांना संधी मिळाली. या मतदारसंघामध्ये मराठी भाषिक कोळी बांधवांची संख्या अधिक आहे. त्यामुळे त्यांच्या मतदानावरच येथील विजयाचं गणित अवलंबून असतं.या मतदारसंघात कुठलंही आरक्षण नसून तो खुल्या प्रवर्गात येतो.

1999 आणि 2004 अशा सलग टोन टर्म येथील मतदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची साथ दिली. राष्ट्रवादीचे नेते सचिन आहिर हे 1999 आणि 2004 असे सलग दोनवेळा या मतदारसंघातून निवडून आले. त्यानंतर 2009 साली राष्ट्रवादीचा हा गड मनसेनं काबीज केला या मतदारसंघातून मनसेचे बाळा नांदगावकर हे विजयी झाले.मात्र मनसेला हा गड कायम राखता आला नाही.

या मतदारसंघावर सध्या स्थितीमध्ये शिवसेनेची मजबूत पकड आहे.2014 आणि 2019 सलग दोन वेळा या मतदारसंघातून शिवसेना उमेदवाराचा विजय झाला.शिवसेना उमेदवार अजय चौधरी यांनी बाजी मारली. त्यांनी 2014 साली मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा 31 हजार एवढ्या मताधिक्यानं पराभव केला.

मतदारसंघाबाबत माहिती

हा मतदारसंघ दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात येतो. या मतदारसंघात कोळी बांधवांची संख्या अधिक आहे. हा मतदारसंघ कायमच एका पक्षाचा गड कधीही राहिला नाही. या मतदारसंघात सध्या स्थितीमध्ये 2 लाख 73 हजार 415 मतदार आहेत.या पैकी पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 51 हजार 456 आहे तर महिला मतदारांची संख्या 1 लाख 22 हजार 31 एवढी आहे.2019 मध्ये या मतदारसंघातून अजय चौधरी हे विजयी झाले होते, यावेळी कोण बाजी मारणार? मतदार राजा कोणाला कौल देणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

2014 मध्ये देखील अजय चौधरी हेच विजयी झाले होते. या मतदारसंघातून 2009 ला मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर हे विजयी झाल्यामुळे या मतदारसंघात 2014 पर्यंत मनसेचा बऱ्यापैकी प्रभाव होता, मात्र 2014 च्या निवडणुकीमध्ये शिवसेनेनं मनसेला मोठा धक्का दिला.  मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांचा जवळपास 31 हजार मतांनी पराभव झालं. शिवसेनेचे उमेदवार अजय चौधरी यांना एकूण मतदानापैकी 49. 27 टक्के मतदान झालं. तर मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर राहिले त्यांना 30 हजार 553 इतकं मतदान झालं. तर भाजप उमेदवार शलका साळवी या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या.