‘शरद पवारांनी अभयसिंहराजे भोसले यांच्यावर अन्याय केला’, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा गंभीर आरोप

| Updated on: Dec 24, 2024 | 10:12 PM

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शरद पवार यांच्यावर माजी मंत्री अभयसिंहराजे भोसलेंवर अन्याय केल्याचा गंभीर आरोप केला आहे. अभयसिंहराजे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले असते तर सातारा जिल्ह्याचा विकास वेगळ्या पद्धतीने झाला असता, असेही म्हटले आहे. शरद पवारांनी अभयसिंहराजे यांना राजकीयदृष्ट्या बाजूला सारल्याचा आरोप शिवेंद्रराजे यांनी केला आहे.

शरद पवारांनी अभयसिंहराजे भोसले यांच्यावर अन्याय केला, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा गंभीर आरोप
शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा शरद पवारांवर आरोप
Follow us on

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. कराडमध्ये आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी खासदार शरद पवार यांनी माजी दिंवगत मंत्री अभयसिंहराजे भोसले यांच्यावर अन्याय केला, असा आरोप शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. “अभयसिंहराजे भोसले यांचे नेतृत्व महाराष्ट्राने पाहिले होते. 1999 साली स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले काँग्रेस सोडून राष्ट्रवादीत आले नसते तर कदाचित काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्रीपदी बसविले असते”, असा मोठा दावा शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे.

शिवेंद्रराजे नेमकं काय म्हणाले?

“अभयसिंहराजे भोसले हे काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नते तथा माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यापेक्षा एक टर्मने सीनियर होते. स्वर्गीय अभयसिंहराजे भोसले संयमी नेतृत्व होते. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप नव्हते. मात्र असे असूनही खासदार शरद पवार यांनी त्यांना का बाजूला ठेवले? हा विषय सोडून देऊ. अभयसिंहराजे भोसले यांना बाजूला ठेवल्याने जसे त्यांचे नुकसान झाले तसेच जिल्ह्याचे मोठे नुकसान झाले”, असा दावा शिवेंद्रराजे भोसले यांनी केला.

हे सुद्धा वाचा

“अभयसिंहराजे भोसले यांना पद मिळाले असते तर सातारा जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न त्याचवेळी सुटले असते. उरमोडी धरण भाऊसाहेब महाराज होते म्हणूनच झाले. या धरणातून आज सातारा माण खटाव या भागाला पाणी मिळत आहे. त्यामुळे त्यावेळी संपूर्ण जिल्ह्याचे नुकसान झाले”, असा दावा करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.