‘कंगनाचे समर्थन मागे घ्या, स्वातंत्र्यवीरांची माफी मागावी,’ विक्रम गोखलेंविरोधात शिवसेनेची चित्रपट सेना आक्रमक

| Updated on: Nov 14, 2021 | 7:00 PM

गोखले यांच्या या भूमिकानंतर आता शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतलाय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोखले यांचे कोणतेही नातेसंबंध नाहीत. त्यांनी कंगणाच्या वक्तव्याचे समर्थन मागे घेऊन, स्वातंत्र्यवीरांची माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेने केलीय.

कंगनाचे समर्थन मागे घ्या, स्वातंत्र्यवीरांची माफी मागावी, विक्रम गोखलेंविरोधात शिवसेनेची चित्रपट सेना आक्रमक
VIKRAM GOKHALE
Follow us on

पुणे : अभिनेत्री कंगना रनौतने देशाला मिळालेल्या स्वातंत्र्यावर वादग्रस्त विधान केले होते. या विधानाचे ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केले आहे. ‘कंगना खरी बोलली. तिच्या मताशी मी सहमत आहे. स्वातंत्र्य भिकेत मिळालं आहे,’ असं गोखले यांनी म्हटलंय. गोखले यांच्या या भूमिकेनंतर आता शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतलाय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोखले यांचे कोणतेही नातेसंबंध नाहीत. त्यांनी कंगणाच्या वक्तव्याचे समर्थन मागे घेऊन, स्वातंत्र्यवीरांची माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेच्या चित्रपट सेनेने केलीय.

कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन मागे घेऊन स्वातंत्र्यवीरांची माफी मागावी

विक्रम गोखले यांच्या वक्तव्याचा शिवसेनेच्या चित्रपट सेनेकडून निषेध करण्यात आलाय. “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि विक्रम गोखले यांचे कोणतेही नातेसंबंध नाहीत. गोखलेंनी ठाकरेंशी कोणताही संबंध जोडू नये. त्यांनी कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन मागे घेऊन स्वातंत्र्यवीरांची माफी मागावी,” असे शिवसेना चित्रपट सेनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या चिटणीस कीर्ती पाठक यांनी म्हटले आहे.

विक्रम गोखले काय म्हणाले ?

विक्रम गोखले आज (14 नोव्हेंबर) पुण्यात एका कार्यक्रमात आले होते. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी भाजप-शिवसेना युती, कंगना रनौत यांचे वादग्रस्त वक्तव्य यावर आपली भूमिका मांडली. “भीक मागून स्वातंत्र्य मिळालं असं कंगना म्हणालीय. तिच्या या म्हणण्याशी मी सहमत आहे. हे स्वातंत्र्य दिलेलं आहे बरं का ? योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. त्या योद्ध्यांना फाशी जाताना त्यावेळचे मोठमोठे लोक बघत राहिले. त्यांनी या योद्ध्यांना वाचवलं नाही. आपल्या देशातील हे लोक ब्रिटिशांविरोधात उभं राहत आहेत हे माहीत असूनही त्यांना वाचवलं नाही. असेही लोक त्याकाळी आपल्या राजकारणात होते. भरपूर वाचलं आहे मी,” असे विक्रम गोखले म्हणाले.

युतीसाठी पुढाकार घेणार

तसेच यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना-भाजपला एकत्रं येण्याचं आवाहनही केलं होतं. या दोन्ही पक्षांना एकत्रं आणण्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत. ज्यांना फॉलोअर्स असतील त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या आघाडीसाठी पुढाकार घाययला हवा, मी घेतोय पुढाकार, असं त्यांनी सांगितलं होतं.

इतर बातम्या :

2014 नंतर काय मिळालं?, पेट्रोल महंगा, गॅस महंगा… छगन भुजबळांनी उडवली कंगनाच्या विधानाची खिल्ली

BJP Meeting | फडणवीस, चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजपची मंगळवारी बैठक, महत्त्वाच्या 3 ठरावांवर चर्चा

परळीत माफियाराज, पंकजांचा धनंजय मुंडेंवर घणाघात; मी थकलेली नाही, लढाई सुरू म्हणत थेट इशारा!