मुंबई : दसऱ्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात जोरदार भाषण केले. या भाषणात त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केला. तसेच राज्यातील जनता आणि शिवसैनिकांना भावनिक साद घातली. पुढच्या जन्मात मला कुटुंब, लोक, आईवडील हेच मिळावेत असे उद्धव ठाकरे म्हणाले.
त्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच जनतेला अभिवादन केले. तसेच आपला आवाज कोणी दाबू शकत नाही. आपला आवाज दाबणारा कोणी जन्मलादेखील नाही. आजचा हा क्षण आपल्या आयुष्यात मोलाचा आहे. जी परंपरा बाळासाहेब ठाकरे यांनी सुरु केली ती आपण पुढे नेत आहोत. तुम्ही माझे खरे शस्त्र आहात. तुमच्यावर मी फुलं उधळली आहेत. मला पुढेसुद्धा हेच प्रेम मिळावे. आईवडील, माझे कुटुंब, परिवार हाच मिळाला पाहिजे, अशी भावना उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. तसेच पुढे बोलताना माझा प्रत्येक जन्म महाराष्ट्रात झाला पाहिजे असेदेखील उद्धव ठाकरे म्हणाले.
तसेच पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्रिपदाबाबतची भावना व्यक्त केली. त्यांनी जनतेने मला मुख्यमंत्री कधीच म्हणू नये, मी त्यांच्याच घरातील एक सदस्य आहे, असे जनतेला वाटावे, अशी भावना व्यक्त केली. “मी पुन्हा येईन असं बोलणारे मी कुठे गेलोच नाही असं म्हणत आहेत. पण मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटू नये. माझ्या जनतेलासुद्धा मी मुख्यमंत्री आहे, असं वाटता कामा नये. मी तुमच्या घरातील आहे, भाऊ आहे असं जनतेला वाटायला हवं,” असं म्हणत त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला.
तसेच पुढे बोलताना पदं आणि सत्ता काय आहेत? पदं येतील जातील. अहमपणा डोक्यात येऊ देऊ नको. ज्या दिवशी डोक्यात हवा जाईल; त्या दिवशी तू संपलास, अशी माझ्या वडील आणि आजोबांची शिकवण आहे, असेदेखील ठाकरे म्हणाले.
Video | निया शर्माने चक्क कॅमेरासमोर अभिनेत्रीला केलं कीस, सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय व्हिडीओ!#NiaSharma | #Liplock | #ViralVideo https://t.co/LfLZXy08L0
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 15, 2021