धुळे: राज्याचे महसूल आणि ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी आता थेट भाजपचे नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाच ललकारले आहे. जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, अशी गर्जनाच अब्दुल सत्तार यांनी केली आहे. त्यामुळे आगामी काळात मराठवाड्यातील राजकारण अधिकच तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. (shivsena minister abdul sattar slams raosaheb danve)
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना अब्दुल सत्तार यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडताना रावसाहेब दानवे यांनाही ललकारले. जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणा नाही, असं सत्तार म्हणाले. यावेळी त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपकडून होत असलेल्या राजकारणाचाही समाचार घेतला. राम मंदिराच्या नावाखाली भाजप राजकारण करत आहे. भाजपचे राजकारण म्हणजे मुँह में राम अन् बगल में छुरी सारखं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
नक्कल करण्यात भाजप आघाडीवर
भाजप नक्कल करण्यात आणि खोटं बोलण्यात नेहमीच आघाडीवर असते, असं सांगतानाच आम्हीही राजकीय भाषेचा वापर केला तर भाजप आमच्यासमोर टिकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
भाजपला धडा शिकवा, निधी कमी पडू देणार नाही
राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका केवळ निवडणुका नाहीत. तर भाजपला धडा शिकवण्याची ही संधीच आहे म्हणून समजा. या निवडणुकीत भाजपला धडा शिकवून शिवसेनेचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणा. जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला तरच शिवसेनेची ताकद दिसून येईल, असं सांगतानाच तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत निधीची कमतरता भासू देणार नाही, असं आश्वासनही त्यांनी दिलं. (shivsena minister abdul sattar slams raosaheb danve)
फडणवीसांना टोला
भाजपचे काही नेते खासगीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत असतात. बाहेर मात्र विरोध केल्यासारखं दाखवत असतात, असं ते म्हणाले. शिवसेनेशी गद्दारी केल्यानेच भाजप सत्तेबाहेर आहे. ते पुन्हा येईल, पुन्हा येईल म्हणाले. पण ते आलेच नाही. मी मात्र शिवसैनिक म्हणून नक्कीच येणार, असा टोलाही त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नाव न घेता लगावला. यावेळी शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांनी जिल्ह्यात शिवसेनेची वाताहत होत असल्याबद्दल जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. याप्रसंगी हिलाल माळी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. (shivsena minister abdul sattar slams raosaheb danve)
VIDEO: TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 7.30 PM | 24 December 2020https://t.co/WIJbkLRMZN#Top9News #TV9Marathi #NewsBulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 24, 2020
संबंधित बातम्या:
वाजपेयींचं 13 दिवसांचं सरकारही शरद पवारांनी चीत केलं?
कामावर जीन्स, टी-शर्टसह रंगीबेरंगी कपडे घालून येण्यास बंदी; नाशिक महापालिकेचा धक्कादायक निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेशी संवाद साधणार; एक कोटी शेतकरी सहभागी होणार
(shivsena minister abdul sattar slams raosaheb danve)