उद्धव ठाकरे यांना अटक करा, शिवसेना प्रवक्त्याची मोठी मागणी, काय घडलं कारण?

| Updated on: Apr 08, 2023 | 9:55 AM

इतरांनी कुणी एक बोललं तर त्यावर ताबडतोब कारवाई होते. आतापर्यंतचं सगळं वर्तन बघता, राज्य शासनाने उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्याने केली आहे.

उद्धव ठाकरे यांना अटक करा, शिवसेना प्रवक्त्याची मोठी मागणी, काय घडलं कारण?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना फडतूस असे संबोधल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध भाजप-शिवसेना असं युद्धच पेटल्याची स्थिती सध्या महाराष्ट्रात दिसतेय. देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक भाजपच्या दिग्गजांनी उद्धव ठाकरे यांना या शब्दावरून सुनावलंय. आता एकनाथ शिंदे समर्थक शिवसेना नेत्याने उद्धव ठाकरे यांना या प्रकरणात अटकच करावी, अशी मोठी मागणी केली आहे. किरण पावसकर यांनी केलेल्या या मागणीवरून नवी चर्चा सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे यांना हे वक्तव्य भोवणार का, अशी शक्यता वर्तवली जातेय. तर कंगना राणावत आणि केतकी चितळे यांना उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या वागणुकीमुळेच मातोश्रीला शाप लागला, हे पावसकर यांचं वक्तव्यदेखील चर्चेत आहे.

‘उद्धव ठाकरेंना अटक करा’

माध्यमांशी बोलताना किरण पावसकर म्हणाले, हे फडतूस म्हणाले, आणखी काय काय बोलले. वेगवेगळ्या पद्धतीने तेच बोलत आहात. इतरांनी कुणी एक बोललं तर त्यावर ताबडतोब कारवाई होते. माझी मागणी आहे, आतापर्यंतचं सगळं वर्तन बघता, राज्य शासनाने उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करावी. त्यांनापण अटक करावी…

स्टुडिओचा पैसा पालिकेला मिळणार का?

आमदार अस्लम शेख आणि तत्कालीन पर्यावरण मंत्री, पालक मंत्री आदित्य ठाकरे यांच्या संगनमताने मालाड येथे अनधिकृत स्टुडिओ बांधण्यात आले. पालिकेने या स्टुडिओवर हातोडा मारला. अवैध बांधकाम प्रकरणी सर्वसामान्यांवर कारवाई केली जाते, मग यांच्यावर का केली जाऊ नये, असा सवाल किरण पावसकर यांनी विचारला. स्टुडिओतून जे उत्पन्न कमावलं, ते पोलिकेला मिळणार आहेत का? पालिका हे पैसे परत मागणार का? एका पक्षाच्या प्रमुखाचा मुलगा आणि माजी मंत्री म्हणून मागील सरकारच्या काळात कारवाई झाली नाही, असा आरोप किरण पावसकर यांनी केला.

आदित्य, अस्लम शेख यांची पार्टनरशिप?

मालाड येथील स्टुडिओ प्रकरणात आदित्य ठाकरे आणि अस्लम शेख यांची पार्टनरशिप आहे का काय हे समोर आलं पाहिजे. एकिकडे हिंदुत्व म्हणायचं आणि दुसरीकडे हे काय सुरु आहे, असा सवाल किरण पावसकर यांनी केलाय.

राऊतांमुळे अधोगती..

मातोश्रीची अधोगती संजय राऊत यांच्यामुळेच सुरु असल्याची टीकाही पावसकर यांनी केली. राऊत यांना मिळालेल्या धमकीचा कोणताही राजकीय संबंध नाही, राऊत यांनी हा प्रकार उगाच छाती बडवून घेण्यासाठी केलाय, असा आरोप पावसकर यांनी केलाय.

हेसुद्धा वाचा…

शरद पवार यांची नवी खेळी? गौतम अदानींवरून 19 विरोधी पक्ष एकिकडे अन् राष्ट्रवादीची वेगळी भूमिका, नवी मागणी काय?