भंडाऱ्याच्या घटनेनंतर पुन्हा एक धक्कादायक प्रकार, नवजात बाळांच्या वॉर्डमध्ये झुरळच झुरळ

| Updated on: Jan 14, 2021 | 8:47 PM

अस्वच्छतेमुळे जिल्हा रुग्णालतील नवजात बालकांच आरोग्य धोक्यात आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेचा निष्काळजीपणा उघड झाला आहे.

भंडाऱ्याच्या घटनेनंतर पुन्हा एक धक्कादायक प्रकार, नवजात बाळांच्या वॉर्डमध्ये झुरळच झुरळ
Follow us on

नाशिक : आरोग्य व्यवस्थेत निष्काळजीपणामुळे अनेक जीवघेणे प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. आताही असाच एक धक्कादायक प्रकार नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, डिलिव्हरी वॉर्डमध्ये नवजात बाळांच्याभोवती झुरळच झुरळ फिरत असल्याचं सांगण्यात येत आहे. अस्वच्छतेमुळे जिल्हा रुग्णालतील नवजात बालकांच आरोग्य धोक्यात आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा आरोग्य व्यवस्थेचा निष्काळजीपणा उघड झाला आहे. (shocking after bhandara hospital fire incident cockroach found in children ward in nashik)

भंडारा जिल्हा रुग्णालयातील घटना ताजी असतानाच नाशिक जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक व्हीडिओनं सगळ्यांच्या पायाखालची जमिन सरकली. अस्वच्छतेमुळे आणि काळजी न घेतल्यामुळे संपूर्ण वॉर्डमध्ये झुरळं आणि किडे झाले आहेत. इतकी झुरळं झाली आहेत की, नवजात बालकांच्या कानात आणि नाकात झुरळ गेल्यास बालक कर्णबधीर होण्याची भीती आहे.

भंडाऱ्याच्या घटनेनंतर आरोग्य व्यवस्था खडखडून जागी होईल अशी अपेक्षा होती. पण या अशा प्रकाराने नाहक बळी गेल्यास त्याला कोण जबाबदार असा प्रश्न पुन्हा उपस्थित होतो. या अशा घटनांमुळे रुग्णांच्या जीवास धोका आहे. एकीकडे कोरोनाचा भीषण काळ सुरू असताना आरोग्याबाबत एवढा निष्काळजीपणा आणखी संसर्गाला आमंत्रण देईल. यामुळे वेळीच स्वच्छेतचं महत्त्व समजून काळीज घेणं गरजेचं आहे.

या प्रकारानंतर तात्काळ रुग्णालय साफ करण्यात यावं आणि झुरळांसाठी योग्य ती फवारनी करून निर्जंतुकीकरण करण्यात यावं असं इथल्या रुग्णांचं आणि जिल्ह्यातील नागरिकांचं म्हणणं आहे. त्यावर आता जिल्हा प्रशासन तात्काळ पाऊलं उचलणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. (shocking after bhandara hospital fire incident cockroach found in children ward in nashik)

संबंधित बातम्या :

‘टीव्ही 9 मराठी इम्पॅक्ट: भंडारा दुर्घटना चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरून डॉ. साधना तायडेंना हटवले, मुख्यमंत्र्यांची माहिती

हात जोडून उभं राहण्याशिवाय काहीच करू शकलो नाही; भंडारा दुर्घटनेने मुख्यमंत्री भावुक

Bhandara fire | भंडारा दुर्घटनेची सखोल चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करणार: मुख्यमंत्री

Bhandara fire | भंडारा दुर्घटनेची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा- भाजप

 

(shocking after bhandara hospital fire incident cockroach found in children ward in nashik)