मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिंदीवनरील (Masjid) भोंग्यावरून राजकारपण चांगलेच तापलेलं होतं. तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी ४ तारखेनंतर भोंगे उतरले नाहीत तर हनुमान चालीसा लावू असे सांगितलं होते. त्यामुळे राज्यात वातावरण आणखीनच तापल. यानंतर राज ठाकरे यांनी आपण आयोध्याला जाणार असल्याचे सांगितले आणि त्यांच्या या दौऱ्याला खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी आपला विरोध दाखवला होता. तसेच राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेची जाहीर माफी मागावी असे ही सांगितलं होतं. त्याला पुण्याचे मनसे नेते वसंत मोरे यांनी उत्तर दिले होते. तर पुण्यात करण्यात आलेल्या मनसेच्या हनुमान चालिसेवरून मनसेच्या बड्या नेत्यांवर टीका केली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी एक पत्रक काढत कोणीही ‘शहाणपणा’ करु नये? असा थेट वसंत मोरेंनाच (Vasant More) इशारा दिल्याचे बोलले जात आहे.
यावेळी राज ठाकरे यांनी ‘माझ्या अयोध्या दौऱ्याबद्दल पक्षातील कोणीही प्रसार माध्यमांशी बोलू नये. पक्षाने प्रवक्ते नेमलेले आहेत. ते याबाबत बोलतील. इतर कुणीही याबाबत बोलण्याचा शहाणपणा करू नये,’ असं फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच ‘इतरही कोणत्याही विषयात पदाधिकारी अथवा कोणीही बोलू नये. ज्यांना जी जबाबदारी दिली आहे, त्यांनीही जबाबदारीने बोलावे, तसेचे भाषेचे भान राखावे,’ अशी तंबी राज यांनी दिली आहे. जे लिहिलंय ते पक्षातील सर्वांनी अत्यंत गांभीर्याने घ्यावे, अशी ताकीदच राज यांच्याकडून पक्षातील नेत्यांना देण्यात आली आहे. तर ही समज थेट वसंत मोरेंनाच देण्यात आल्याचेही कळत आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी विरोध कायम ठेवला आहे. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांना अपमानित केल्याबद्दल माफी मागावी, अशी भूमिका ब्रिजभूषण शरण सिंह यांनी घेतली होती. तसेच सेना घेऊन आलात तरी राज ठाकरे यांनी अयोध्येत घुसू देणारनाही अशीही भूमिका ब्रिजभूषण शरण सिंह यांनी घेतली होती. त्यावर पलटवार करताना, मनसे नेते वसंत मोरे यांनी उत्तर प्रदेशचे सरकार योगी चे आहे. ते बघतील. तसेच राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या अनुशंगाने पक्षाच्या नेत्यांमध्ये आणि पदाघिकाऱ्यांमध्ये बैठक होईल. तसेच खासदार ब्रिजभूषण शरण सिंह हे आयोध्याच्या दोऱ्यावरून उगाचच अडचण निर्माण करून येथील लोकांना अडचणीत आणत आहेत.
तसेच आम्ही आमच्या भाषेचा आमच्या राज्याचा आणि आमच्या लोकांचा प्रश्न मांडला. आणि आता हे उकरून काढणे योग्य नाही. आणि जर दौऱ्यादरम्यान त्यांना राजकारण करायचे असेल करूदेत. गरज पडल्यास त्याचे उत्तर पक्षाचे कार्यकर्ते नेते देतिल. आम्हाला त्यावेळी जे करायचे आहे ते करू. पाच तारिख अजून लांब आहे. तसेच खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे राज यांच्या बाबात वैयक्तीत स्टेटमेंट आहे, ते उत्तर प्रदेश आणि बिहारच्या जनतेने घेऊ नये असेही मोरे यांनी म्हटले होते.
दरम्यान पक्षप्रमुखांनी सांगितल्या प्रमाणे वसंत मोरे यांनी कात्रज भागातील त्यांच्या ऑफिससमोरील हनुमान मंदिरात महाआरती आयोजन केले होते. त्यावेळी ही राज ठाकरे तेथे दिसले नाहीत. तेव्हा ही जाहीर भुमिका घेत मोरे यांनी या लढाईत सेनापतीच कुठे दिसले नाहीत असं म्हटलं होतं.