लाडकी बहीण योजनेला खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन

| Updated on: Aug 31, 2024 | 4:33 PM

नागपुरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका केली. काही लोकं या योजनेच्या विरोधात कोर्टात गेले त्यांची याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. या योजनेत खोडा घालणाऱ्या लोकांना जोडा दाखवा असं मुख्मयंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.

लाडकी बहीण योजनेला खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन
Follow us on

नागपुरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, ‘तुम्ही सरकारला ताकद दिली तर आम्ही ही रक्कम वाढवत नेऊ. ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है. आम्ही हात आखडणार नाही. आम्हाला या बहिणींना लखपती झालेलं पाहायचं आहे. मोदींनीही लखपती दीदी योजना सुरू केली. तीन कोटीतील 50 लाखापेंक्षा लाभार्थी महाराष्ट्रातील झाल्याशिवाय राहणार नाही. आज ९ ठिकाणी हा कार्यक्रम झाला. राज्यातील हा नवदुर्गांचा सन्मान आहे.’

‘जे योजनेला खोडा घातलीतल त्यांना जोडा दाखवा. का तुम्ही आमच्या योजनेला विरोध करत आहात. का तुम्ही आमच्या योजनेविरोधात कोर्टात जात आहेत. याचा जाब विचारा. आम्ही आता सुरक्षित बहीण देणार. कुणी बहिणींवर अत्याचार केला तर त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. हे सरकार कोर्टात मागणी करणार. चुकीला माफी देणार नाही. गुन्हेगाराला माफी देणार नाही. आम्ही तुमच्या सुरक्षेची जबाबदारी घेऊ. तुमच्या हिताचा निर्णय घेऊ’

‘ही योजना फक्त रक्षाबंधनासाठी नाही. ही योजना फक्त भाऊबीजेसाठी नाही. ती कायम राहणार आहे. एवढं लक्षात ठेवा. एकीकडे विकास सुरू आहे. दुसरीकडे कल्याणकारी योजना करत आहोत. आपण दोन वर्षात जे काम केलं, ते लक्षात ठेवा. महायुतीच्या पाठी आशीर्वाद ठेवा.’

‘आम्ही जे बोलतो ते करतो. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या योजनेमुळे आतापर्यंतच्या सर्व कार्यक्रमांचे रेकॉर्ड मोडले गेले आहेत. विरोध किती काही म्हटलं तरी तुमचं सरकार ही योजना बंद होऊ देणार नाही. बंद होणार नाही, नाही नाही नाही…’

विरोधक म्हणतात ही योजना चुनावी जुमला आहे, फसवी घोषणा आहे. पैसे काही येणार नाही. वाट बघत बसा. पण जसे पैसे खात्यात आले, तसे विरोधकांचे चेहरे पडले. बुरी नजरवाले तेरा मुंह काला. मनंतर म्हणाले, पैसे काढून घ्या. नाही तर सरकार पैसे काढून घेईल. पण हे सरकार देणारं आहे. घेणारं नाही.