राज्यात सध्या कोरोनाचा (Corona) कहर सुरू आहे, तिसऱ्या लाटेने सर्वांना धडकी भरवली असताना आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे आयसीएमआरने (ICMR) एक मोठा निर्णय घेतला आहे. मोनलूपिरावीर या अॅन्टीव्हायरल औषधांचे साईड इफेक्ट्स आहेत, अशी बाब निदर्शनास आल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. गरोदर महिला, 15 ते 18 वयोगटातील मुलांना हे औषध देता येतं नाही, कारण लहानं मुलांच्या हाडाची वाढ थांबू शकते, अशी माहिती आयसीएमआरकडून देण्यात आल्याने, आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कोणते औषध प्रभावी आहे? या लाटेत तारणहार काय असा सवाल अनेकांपुढे उपस्थित झाला आहे. या औषधाचा वापर न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयसीएम आरनं घेतलेला निर्णय योग्य असल्याचे मत आरोग्य तज्ज्ञांकडून नोंदवण्यात आले आहे.
मोनलूपिरावीरचा नेमका धोका काय?
या औषधांमुळे हाडांची वाढ थांबू शकते असेत मत आयसीएमआरने नोंदवल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळेच गरोदर महिलांना हे ओषध देता येत नाही, हे औषध दिल्यास त्यांच्या पोटातील बाळाची वाढ थांबण्याचा संभाव्य धोका आहे. फक्त गरोदर महिलाच नाही तर, 15 ते 18 वयोगटातील मुलांना हे औषध देता येतं नाही, कारण लहान मुलांच्या हाडाची वाढ थांबू शकते, असे मत तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
भारतात आणि महाराष्ट्रात लसीकरण मोहीम वेगवान सुरू आहे. बऱ्याच जणांचे दोन डोसचं लसीकरण झालेलं आहे, याचा फायदा फक्त 30 टक्के लोकांनाच आहे, असेही तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळेही आणखी चिंता वाढली आहे. टास्क फोर्सचे सदस्य डॉ. कपिल झिरपे यांनी ही माहिती दिली आहे. राज्यात आणि देशात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेने आणि ओमिक्रॉनने कहर माजवला आहे. त्यामुळे धाकधूक वाढली आहे, अनेकांना पुन्हा लॉकडाऊन होण्याची भिती आहे, अशातच या माहितीने आणखी डोकेदुखी वाढवली आहे.