Marathi News Maharashtra Sindhudurg chipi airport inauguration live photo update today in presence of maharashtra cm uddhav thackeray union civil aviation minister jyotiraditya scindia bjps narayan rane mumbai to sindhudurg
Sindhudurg chipi airport | तब्बल 16 वर्षांनी एकाच मंचावर, शेजारी-शेजारी खुर्ची, तरीही राणे-ठाकरेंनी एकमेकांकडे पाहिलं नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातली टशन चिपी विमानतळावरही दिसली. तब्बल 16 वर्षांनी एकाच मंचावर, शेजारी-शेजारी खुर्ची, तरीही राणे-ठाकरेंनी एकमेकांकडे पाहिलं नाही.
1 / 10
कोनशिलेचे अनावरण करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी येथील विमानतळाचे उद्घाटन करण्यात आले.
2 / 10
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातली टशन चिपी विमानतळावरही दिसली. विमानतळाच्या कोनशिलेच्या अनावरप्रसंगी उद्धव ठाकरे, नारायण राणे, अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि इतरही मंत्री उपस्थित होते.
3 / 10
यावेळी नारायण राणे आणि अजित पवार यांनी एकाच वेळी एकमेकांना नमस्कार घातला. बाळासाहेब थोरात आणि राणेंनीही एकमेकांना नमस्कार घातला. पण ना उद्धव ठाकरेंनी राणेंकडे बघितलं ना राणेंनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलं. एकंदरितच तेरे भी चुप-मेरे भी चुप असा प्रसंग उपस्थितांनी अनुभवला.
4 / 10
दुपारी साडेबाराच्या आसपास राणे आणि मुख्यमंत्र्यांचं विमान चिपीवर लँड झालं. पालकमंत्री उदय सामंत, स्थानिक नेते आणि मंत्री, जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस प्रमुखांनी मुख्यमंत्री आणि राणेंचं स्वागत केलं.
5 / 10
केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हे दिल्लीहून दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित. खासदार विनायक राऊत हे सूत्रसंचालन करीत असून त्यांनी सर्वांचे स्वागत केले
6 / 10
मुख्यमंत्री महोदयांच्या समवेत उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे आगमन. पालकमंत्री उदय सामंत यांनी मान्यवरांचे स्वागत केले.
7 / 10
पहिल्यांदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार आणि बाळासाहेब थोरात हे कोनशिलेच्या दिशेने रवाना झाले. नंतर काही वेळातच राणे कोनशिलेजवळ आले. तिथे उद्धव ठाकरे-राणे एकमेकांना नमस्कार करुन कमीत कमी स्मितहास्य करतील, अशी शक्यता होती. परंतु ना उद्धव ठाकरेंनी नमस्कार केला ना राणेंनी...!
8 / 10
उद्धव ठाकरे आणि नारायण राणे जवळपास 16 वर्षांनी एकाच मंचावर येत आहेत. दरम्यानच्या काळात त्यांच्यातलं राजकीय वैर संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवलं. पण आज कोकणच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वकांक्षी असलेल्या चिपी विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी राणे-ठाकरे आपल्यातल्या वाद बाजूला ठेऊन एकमेकांना बोलतील, चर्चा करतील. कमीत कमी एकमेकांना पाहून नमस्कार तरी करतील, अशी शक्यता होती. पण तसं काहीच झालं नाही.
9 / 10
कार्यक्रमाला कोणतंही गालबोट लागणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं आम्ही कोकणात स्वागत करु, अशी भूमिका नारायण राणे यांनी मांडली होती. त्यामुळे आज राणे मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतील, अशी शक्यता होती. पण मनातला दुरावा यावेळीही तसाच राहिला.
10 / 10
ना उद्धव ठाकरेंनी राणेंकडे बघितलं ना राणेंनी उद्धव ठाकरेंकडे पाहिलं. दोघांमधील राजकीय शत्रूत्व सर्वांना माहिती आहे, त्यातील टशन आज कोकणवासियांनी आणि महाराष्ट्राने पाहिली.