मुंबई – राज्यसभेसाठी मतदान (Voting for Rajya sabha election) करताना कोणतीही चूक केली नाही, मतदान करताना जी प्रक्रिया करायची असते तीच केली आहे, असे स्पष्टीकरण घेतलेल्या आक्षेपावर मंत्री जितेंद्र आवाहड ( Jitendra Awhad)यांनी दिले आहे. मत दिल्यानंतर ते पक्षाच्या एजंटला दाखवणे आवश्यक असते, ते केलं नाही तर पक्षाचं सदस्यत्व रद्द होऊ शकते. हा संभ्रम जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी माध्यमांसमोर आल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. संपूर्ण राज्यासमोर (people of Maharashtra)आपण कोणतीही चूक केली नाही, हे सांगायला आल्याचेही आव्हाड यांनी सांगितले. यावेळी त्यांचा आवाज कातर झाला होता. मतदान केल्यावर कुणी आक्षेप घेतला नाही, घरी गेल्यावर आक्षेप घेतल्याचे समजले, असेही आव्हाड यांनी सांगितले. महाविकास आघाडीसह भाजपाच्या नेत्यांवरही आक्षेप घेतले गेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
दुपारी साडेबाराच्या सुमारास विधानसभेत पोहोचल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. विधानसभेत आल्यावर कुणीशाही न बोलता थेट मतदानाला गेल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जाऊन आल्यावर, मतदानासाठी गेल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मतदान केल्यानंतर ते पक्षांच्या एजंटना दाखवणे निवडणूक आयोगाच्या नियमानुसारच आहे. कागद त्यावेळी छातीवर होता, कॅमेरा मागे असल्याचे त्यांनी सांगितले. त्याठिकाणी जोरात हासलो, त्याला वेगळी कारणे होती, असेही ते म्हणाले. त्यानंतर मतपत्रिका बंद करून आलो, मतदान केलं आणि गेटवर आलो, हा सगळा घटनाक्रम त्यांनी सांगितला. बाहेर आल्यावर घरी गेल्यावर माध्यमांतून आक्षेप घेतल्याचे कळाल्याचे त्यांनी सांगितले. मतदानासाठी आवश्यक असलेली क्रिया आपण केलेली आहे, माझ्याकडून कुठलाही गुन्हा झालाय असे आपल्याला वाटत नाही, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले.
या सगळ्यात चुका केल्यात असं महाराष्ट्रापुढे जायला नको, असेही त्यांनी सांगितले. केंद्रीय निवडणूक आयोगापेक्षा आमचे नाते महाराष्ट्रातील जनतेशी आहे, असे आव्हाड म्हणाले. काही कारण नसताना भाजपा हा खेळ लांब घेऊन निघाले आहेत, असा आरोप आव्हाडांनी केला आहे. कारण नसताना काहीतरी रडीचे डाव टाकत असल्याची टीकाही त्यांनी भाजपावर केली. मतदान ज्या व्यक्तीला दाखवायचं असतं नियमाने त्यांना मतदान दाखवलंस ते न दाखवल्यास पार्टी सहा वर्षे निंलंबित करू शकते, त्यातून राजकीय करिअर संपू शकतं, असं आव्हाड म्हणाले. मात्र आता हा मुद्दाम संभ्रम निर्माण केला जात आहे. गैरसमज पसरत असतील तर त्याचा खुलासा करायला माध्यमांसमोर आल्याचे त्यांनी सांगितले.