पुणे : ज्येष्ठ समाजसेवक (Social Worker) अण्णा हजारे (Anna Hajare) यांना काल पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये (Rubby Hospital) दाखल करण्यात आलं होतं. छातीत दुखत असल्यामुळे अण्णांना रुग्णालयात हलवण्यात आल्याची माहिती मिळाली होती. मात्र, अण्णा हजारे यांची प्रकृती उत्तम असून, त्यांना नेहमीच्या तपासण्यांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. अण्णांच्या कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, अण्णा हजारे हे पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार काल नियमित वैद्यकीय तपासणीसाठी रुबी हॉल क्लिनिकला दाखल झाले होते. काल सर्व मुख्य तपासण्या करण्यात आल्या होत्या. उर्वरित तपासण्या आज सकाळी करण्यात आल्या.
सर्व तपासण्यांचे अहवाल नॉर्मल आले असल्याने वयाच्या 85 व्या वर्षीही अण्णा पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे डॉ. परवेझ ग्रँट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगीतले आहे. नियोजित सर्व तपासण्या पूर्ण झाल्याने काही वेळापूर्वी डॉक्टरांनी अण्णांना राळेगणला जाण्यास परवानगी दिली. त्यानुसार अण्णा राळेगणकडे रवाना झाले आहेत. दरम्यान अण्णा रुग्णालयात दाखल झाल्याच्या बातम्या पसरल्यानंतर उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी दूरध्वनीद्वारे अण्णांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. अण्णांच्या सोबत स्वयंसेवक श्यामकुमार पठाडे व संदीप पठारे आहेत.
अण्णांना रुग्णालयातून निरोप देण्यासाठी रुबी हॉल क्लिनिकची संपूर्ण टिम उपस्थित होती. डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. मखळे, डॉ. मुनोत यांनी अण्णांच्या सर्व तपासण्या केल्या. काही दिवस अण्णांनी संपूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला असल्याने किमान एक आठवडा कार्यकर्त्यांनी अण्णांना भेटण्याचा आग्रह धरू नये, अस आवाहन अण्णांच्या कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.
अण्णा हजारे यांच्या प्रकृतीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी केली. हजारे लवकर बरे व्हावेत अशी सदिच्छा त्यांनी व्यक्त केली. सध्या मुख्यमंत्री ठाकरे एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल असून त्यांच्यावर फिजिओथेरपी सुरू आहे. मात्र आज अण्णा हजारे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समजल्यावर त्यांनी अण्णांच्या प्रकृतीला आराम मिळावा अशी भावना व्यक्त केली.
ज्येष्ठ समाजसेवक श्री अण्णा हजारेजी यांच्या प्रकृती अस्वास्थाबाबत समजले.
त्यांना लवकर बरे वाटावे, अशी मी प्रार्थना करतो !
Wishing speedy recovery to Noted Social worker Shri Anna Hajare ji! https://t.co/OmpjmxYxwE— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 25, 2021
इतर बातम्या :