Solapur ST Accident : सोलापुरातील एसटी अपघातातील जखमींसोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद, जखमींना सीएम सहायता निधीतून मदतीचे निर्देश

| Updated on: Jul 24, 2022 | 8:55 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्कलकोट येथे झालेल्या अपघातग्रस्त रुग्णांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी केलेली मदत पाहून आम्ही खूप भारावलो. आम्हाला खूप आनंद झाला.

Solapur ST Accident : सोलापुरातील एसटी अपघातातील जखमींसोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद, जखमींना सीएम सहायता निधीतून मदतीचे निर्देश
सोलापुरातील एसटी अपघातातील जखमींसोबत मुख्यमंत्र्यांचा संवाद
Follow us on

सोलापूर : सोलापूर-गाणगापूर एसटी अपघातातील जखमींसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवाद साधला. शासन आणि प्रशासन पूर्णपणे जखमी नागरिकांच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. एसटी बस अपघातातील गंभीर जखमींना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत. सोलापूर-गाणगापूर एसटी बसला अक्कलकोटजवळ अपघात झाला. या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉल करून चौकशी केली. यावेळी त्यांनी शासन आणि प्रशासन तुमच्या पाठीशी आहे. तुम्हाला चांगले उपचार मिळवून देऊ, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले. अपघातात जखमी प्रवाशांना तातडीने अक्कलकोट ( Akkalkot) किंवा जवळपासच्या रुग्णालयात (Hospital) हलवून शासकीय खर्चाने योग्य त्या उपचारांची व्यवस्था करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. त्याचप्रमाणे अपघातात ज्यांना गंभीर दुखापत झाली आहे अशा ठरावीक किंवा मोठा अस्थिभंग झालेल्या प्रवाशांना मुख्यमंत्री सहायता निधीतून (CM Aid Fund) 50 हजार रुपये अधिकची आर्थिक मदत करण्यात यावी असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

आमदार, जिल्हाधिकारी पोहचले रुग्णालयात

अपघात झाल्याचे कळताच मुख्यमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकारी तसेच एसटी महामंडळ व पोलिसांकडून याची माहिती घेतली. जखमी तसेच इतरही प्रवाशांची व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. या अपघातात एकूण 18 प्रवासी जखमी झालेत. सगळ्यांची प्रकृती आता स्थिर आहे. यातील अनेक प्रवाशांना उपचाराअंती घरी सोडण्यात आले आहे. 6 प्रवासी अद्यापही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्ट, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते आणि माजी महापौर महेश कोठे हे देखील सोलापूर जिल्हा रुग्णालयात उपस्थित होते.

अपघातग्रस्त महिलेने मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अक्कलकोट येथे झालेल्या अपघातग्रस्त रुग्णांशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधला. मुख्यमंत्र्यांनी केलेली मदत पाहून आम्ही खूप भारावलो. आम्हाला खूप आनंद झाला. मुख्यमंत्र्यांनी माझ्या लहान मुलावर सर्वाधिक तत्परतेने उपचार केले. त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार. अपघात झाल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांना फोन केला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ फोनची दखल घेऊन रुग्णांवर उपचार केले. जिल्हा प्रशासनाला तात्काळ सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांच्या या तत्परतेमुळे रुग्णांना खूप दिलासा मिळाला. अक्कलकोटमधील ट्रॉमा केअर सेंटरचे बांधकाम नुकताच पूर्ण झालेला आहे. तेथील इन्फ्रास्ट्रक्चरही तयार आहे. मी मागील मुख्यमंत्र्यांना चार ते पाच महिन्यापासून मागणी करतोय की वैद्यकीय कर्मचाऱ्याअभावी ते ट्रॉमा केअर सेंटर बंद आहे. मात्र त्याचे काही झाले नाही. याबाबत नव्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना बाब लक्षात आणून दिले आहे. त्यांनी तात्काळ त्याची दखल घेत लवकरच अक्कलकोट येथील ट्रॉमा केअर सेंटर सुरू होईल असं आश्वासन दिले. अशी माहिती अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली. वर्षा वडगावकर या अपघातग्रस्त महिलेनीही समाधान व्यक्त केलं.

हे सुद्धा वाचा