सोलापूर : नैसर्गिक शेतीचं दहा हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं.गुजरातच्या राज्यापालांनी याचं एक मॉडल तयार केलं. याचा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला. कुठलंही रासायनिक पदार्थ न वापरता तिप्पट उत्पादन घेणं सुरू केलं. त्यामुळं देशी गायीचं शेण, गोमुत्र, गुळ टाकून वैज्ञानिक पद्धतीनं शेती ते करतात. येत्या काळात आपल्या राज्यात नैसर्गिक शेतीचं मॉडल राबवायचं आहे. शेतकरी आपल्या शेतीमध्ये सर्व नैसर्गिक गोष्टी तयार करेल. बाहेरून त्याला काही विकत आणावं लागणार नाही. उत्पादकतेवर त्याचा काही परिणाम होणार नाही. उलट उत्पादकता वाढेल. हे काम आपण सुरू करतो आहोत, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवेढा येथील सभेत सांगितलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सुधाकरपंत परिचारक निवडणुकीसाठी उभे होते. त्यावेळी मी एक सभा घेण्याकरिता आलो होतो. 24 गावांना पाणी देणारी मंगळवेढा उपसा सिंचन योजना करणार, असं त्या सभेत आश्वासन दिलं. ते आश्वासन दिल्यानंतर सरकारचं गेलं. पण, मी सांगितलं होतं पुन्हा येईल.तुमची योजनादेखील मी पुन्हा यायची वाट पाहत बसली. मधल्या सरकारनं फाईल सरकवलीदेखील नाही.
तुमच्या आशीर्वादान समाधान दादांना तुम्ही निवडून दिलं. जे सांगितलं होतं आम्ही करेक्ट कार्यक्रम केला. आमचं सरकार आल्याबरोबर या योजनेला गती दिली. समाधान दादा यांनी पाठपुरावा केला.
त्यासंदर्भात सगळ्या मान्यता घेतल्या. मुख्यमंत्र्यांची सही झाली. इस्टिमेट 2017-18 च्या दरसूचीनं ठरलं. म्हणून नियोजन विभागानं लिहिलं की, नवीन दरसूचीप्रमाणे प्राकलन याव, अंस सांगितलं. नवीन दरसूचीप्रमाणे प्रकलन आल्याबरोबर कॅबिनेटपुढं ठेऊ. नवीन दरानं मान्यता देऊ. त्यानंतर 24 गावांना पाणी देणारा सिंचन प्रकल्प पूर्ण होईल, असं आश्वासनं देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
बसवेश्वरांचं स्मारक व्हावे, 151 कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य सरकारकडं आणला होता. प्रस्ताव थंडबस्त्यातून बाहेर येईल. बसवेश्वराचं स्मारक करणार आहोत. चोखामोळा यांच्या स्मारकासंदर्भात पैसे खर्च झाले नव्हते. ते येत्या काळात पूर्ण करू. सगळ्या मागण्यांची नोंद मी घेतली आहे. पुढच्या निवडणुकीपूर्वी ही सर्व काम करून दाखवू. या कामाच्या भरोश्यावर लोकांसमोर जाऊ, असं वक्तव्य फडणवीस यांनी मंगळेढा येथील सभेत बोलताना केलं.