सोलापूरः देशभर ज्या वंदे भारत एक्सप्रेसचे गवागवा करण्यात आला आहे, त्याच रेल्वेमध्ये आता धक्कादायक प्रकार घडल्यामुळे वंदे भारत एक्सप्रेस पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.रेल्वे खात्यावर विश्वास ठेऊन अनेक जण लांब पल्ल्याचा प्रवास करत असतात. त्याच प्रमाणे आजही एक प्रवाशी वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करत होता. त्यावेळी या गाडीमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
रेल्वेतून प्रवास करत असताना चहा,जेवण, अल्पोपहाराची सोयही केली जाते. यावेळी वंदे भारत एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना एका प्रवाशाने खाण्यासाठी बिस्कीट घेतलेली होती.
मात्र ती बिस्कीट घेतल्यानंतर प्रवाशाच्या लक्षात आले की, ही खाण्यासाठी घेतलेली बिस्कीटे ही कालबाह्य झालेली आहेत ही गोष्ट त्या प्रवाशाच्या लक्षात येताच त्यांनी रेल्वेकडे त्याबाबत तक्रारही केली आहे.
वंदे भारत एक्सप्रेस या रेल्वेने नागेश पवार हे सोलापूरहून मुंबईकडे प्रवास करत होते. हा प्रवास करत असताना त्यांनी खाण्यासाठी म्हणून रेल्वेतील काही खाद्यपदार्थ विकत घेतले होते.
त्यामध्ये त्यांनी रेल्वेमध्ये मिळणारी बिस्कीट घेतली होती. सकाळच्या वेळेत सोलापूर स्थानकातून गाडी निघाली तेव्हाच काही वेळातच प्रवाशांना ही चहा आणि बिस्किटे देण्यात आली. मात्र ज्या वेळी चहासोबत दिलेली बिस्किटे चक्क कालबाह्य तारखेची आढळून आल्यानंचक मात्र त्यांना धक्काच बसला.
रेल्वेमध्ये घडलेला हा धक्कादायक प्रकारचा त्यांनी व्हिडीओ तयार केला. त्यानंतर त्यांनी रेल्वे प्रशासनाकडे याची तक्रारही केली आहे.
त्यामुळे त्यांनी त्यांच्या हा अनुभवाचा व्हिडीओ तयार केला होता.त्यानंतर त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
या व्हिडिओमधून त्यांनी या सगळ्या प्रकाराची रेल्वे प्रशासनाकडे ऑनलाईन तक्रार केल्याचेही सांगितले आहे. दरम्यान या संदर्भात रेल्वे प्रशासनाची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न केला असता वंदे भारत एक्सप्रेसमध्ये खानपानाची जबाबदारी ही आयआरसिटीसीचीच असल्याचेही सांगण्यात आले आहे.
या सगळ्या प्रकारबद्दल आम्ही आयआरसिटीसीला पत्र लिहणार असल्याचे सोलापूर रेल्वे विभागाकडून सांगण्यात आले आहे.