सोलापूर : सोलापुरात (Solapur) गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सोलापुरातील फौजदार चावडी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झाला आहे. छावा संघटनेचे शहराध्यक्ष योगेश पवार यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. मराठा आरक्षणाच्या निकालासंदर्भात न्यायालयाच्या (Court) निकालाचा अवमान केल्याबद्दलआणि दोन समाजात तेढ निर्माण करणारे चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. tv9च्या कार्यक्रमात हे वक्तव्य केल्याचा पुरावा देत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 153अ ब, 500, 506, 507 या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनदरम्यान आक्षेपार्ह विधानामुळे त्यांच्याविरोधात पोलिसात (Police) तक्रार देण्यात आली. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पहिल्यांदा साताऱ्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर राज्यात वेगवेगळ्या भागात सदावर्तेविरोधात गुन्हा दाखल झाला.
सातारा पोलिसात गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात मराठा आरक्षणावरून केलेल्या आक्षेपार्ह विधानाविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधाराने सातारा पोलिसांनी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर सदावर्तेंना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मुंबई पोलिसांना सदावर्तेंना ताब्यात घेण्यामागचे प्रकरण होते शरद पवारांच्या घरावर झालेला हल्ला. याप्रकरणी सदावर्ते यांना न्यायालयाने दिलासा दिलेला नव्हता. त्यानंतर सदावर्तेंना सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, आता सातारा पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतरही इतडे मुंबईतील गिरगाव कोर्टात युक्तिवाद सुरूच होता. या युक्तिदावादादरम्यान गिरगाव कोर्टाने बुधवारी गुणरत्न सदावर्ते यांना फटकारले. त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
मराठा आरक्षणासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य वकील गुणरत्न सदावर्ते यांना भोवले आणि राज्यातील वातावरण बिघडवण्याचा, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सदावर्तेंनी केला. त्यानुसार त्यांच्यावर आधी सातारा, मग कोल्हापूर, सोलापूर अशा विविध ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.