Tanaji Sawant : अन् आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना अश्रू अनावर; मराठा समाजातील आत्महत्याग्रस्त कुटूंबाशी संवाद साधताना आले गलबलून

| Updated on: Jun 22, 2024 | 9:19 AM

Health Minister Tanaji Sawant shed tears : मंत्री असले तरी त्यांना पण भाव-भावना असतातच. त्या काही लपविता येत नाही. आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना पण त्यांच्या भावना रोखता आले नाही. त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांना हुंदके आवरले नाही.

Tanaji Sawant : अन् आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना अश्रू अनावर; मराठा समाजातील आत्महत्याग्रस्त कुटूंबाशी संवाद साधताना आले गलबलून
तानाजी सावंतांना अश्रू अनावर
Follow us on

राज्यात सध्या आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. मराठा समाजाचे ओबीसीत समावेश करावा म्हणून आंदोलन तीव्र झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून हे आंदोलन उभं राहिले आहे. गेल्या वर्षीपासून आंदोलनाला धार आली. अंतरवाली सराटीपासून सुरु झालेले आंदोलन राज्यभर पसरले. लाखोंचे मोर्चे निघाले. मुंबईच्या वेशीवर मोठे आंदोलन झाले. काही पदरात पडले, काही आश्वासनांची अजून अंमलबजावणी झालेली नाही. निराशेतून काही तरुणांनी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्या. हे दुःख मोठे आहे. घरातील कर्त्या माणसांनी अशी टोकाची भूमिका घेतल्याने समाज हादरुन गेला आहे. कोणालाही अशा घरातील परिस्थिती हादरवून टाकते. या घरातील महिलांचा आक्रोश मन हेलावून टाकतो.

तानाजी सावंत यांना अश्रू अनावर

मराठा समाजातील आत्महत्याग्रस्त कुटूंबाशी संवाद साधताना आरोग्यमंत्री तानाजी सावंतांना अश्रू अनावर झाले. बार्शी तालुक्यातील मराठा आहोरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या युवकाच्या कुटुंबीयांची आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी भेट घेतली. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी बार्शीतील देठे कुटुंबांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

हे सुद्धा वाचा

भावना झाल्या अनावर

आत्महत्याग्रस्त कुटुंबांशी बोलताना मंत्री तानाजी सावंत यांच्या डोळ्यात अश्रू आले. कुटुंबियांचा आधार गेल्यावर काय होते, याचा जाणाऱ्या व्यक्तीने विचार करावा. सर्व बांधवांना हातापाया पडून सांगतो, हत्ती गेला आहे आता फक्त शेपूट राहिले आहे. त्यामुळे आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

मुला-मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी

प्रसाद देठे यांच्या कुटुंबियांना सावंत यांनी 5 लाख रूपयांचा धनादेश दिला. इतकेच नाही तर त्यांच्या तीन मुला-मुलींच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची जबाबदारी तानाजी सावंत यांनी घेतली. तानाजी सावंत यांनी ओबीसी मराठा समाजातील युवकांनी टोकाचे पाऊल उचलू नये असे आवाहन केले. यावेळी उपस्थित अनेकांना अश्रू अनावर झाले. त्यांना हुंदके थांबविता आले नाही. यावेळी तरुणांनी असे टोकाचे पाऊल उचलू नये. सरकारवर विश्वास ठेवावा. आरक्षणाची प्रश्न लवकरच मार्गी लागेल असे आवाहन करण्यात आले.