Solapur accident : आईसोबत जात होता चिमुकला, भरधाव डम्परने आईपासून हिरावले; नेमकं काय घडलं?

| Updated on: Jan 22, 2023 | 8:08 PM

आईसोबत जात असताना डंपर आणि दुचाकीचा अपघात झाला. डांबरमिश्रित खडी वाहतूक करणाऱ्या डंपरखाली चिरडून हा अपघात झाला आहे.

Solapur accident : आईसोबत जात होता चिमुकला, भरधाव डम्परने आईपासून हिरावले; नेमकं काय घडलं?
सोलापूर अपघात
Follow us on

सोलापूर : आई आपल्या मुलांसोबत बाहेर जाते. मुलं बाहेर जाण्यासाठी आईच्या मागे लागतात. सोबत नेताना तिला तिच्या मुलाची अतिशय काळजी असते. सोलापुरात दहा वर्षांचा मुलगा आईसोबत रस्त्याने गाडीवर जात होता. सोबत आई असल्याने तो तसा निर्धास्त होता. पण, डम्परने दुचाकीला चिरडले. या अपघातात मुलाचा मृत्यू झाला. सोलापूरमध्ये चिमुकल्याचा डंपरखाली अपघाती मृत्यू झाला. छत्रपती संभाजी महाराज चौकात ही घटना घडली. श्रीपाद पवन कवडे असे मृत मुलाचे नाव आहे. मृतक श्रीपाद हा अवघ्या दहा वर्षाचा आहे.

आईसोबत जात असताना डंपर आणि दुचाकीचा अपघात झाला. डांबरमिश्रित खडी वाहतूक करणाऱ्या डंपरखाली चिरडून हा अपघात झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर बराचवेळ वाहतूक खोळंबली होती.

सोलापुरातील श्रीपाद पवन कवडे या चिमुकल्याचे अपघाती मृत्यू झाला. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आपल्या आईसोबत दुचाकीवर जात असताना डंपरखाली चिरडून श्रीपादचा मृत्यू झाला आहे.

 

साधारणपणे पावणेपाचच्या सुमारास आपल्या आईसोबत श्रीपाद छत्रपती संभाजी महाराज चौकातून शिंदे चौक येथील आपल्या राहत्या घरी जात होता. यावेळी छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये डांबर मिश्रित खडी घेऊन जात असलेल्या डंपरला दुचाकीची धडक लागली.

 

डंपरच्या मागील चाकाखाली श्रीपादचा तोल गेला तर त्याची आई डावीकडे पडली. यामुळे श्रीपादचा गाडीखाली चिरडला गेला आणि जागेवरच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघाती मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराज चौकापासून ते सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक दोन किमीपर्यंत पूर्णतः जाम झाली होती.