Solapur Fire : सोलापूरमध्ये कौटुंबिक वादातून माथेफिरुने पेटवले स्वतःचेच घर

| Updated on: Mar 22, 2022 | 1:13 AM

श्याम भंडारी हा सोलापुरातील गोदुताई विडी घरकुल रोडवरील माळीनगर येथे कुटुंबासोबत राहतो. श्यामचे नोहमी त्याच्या पत्नीसोबत वाद होत होते. मागील चार दिवसापासून श्याम पती-पत्नीचे वाद झाल्यानंतर घर पेटवण्याची धमकी देत होता.

Solapur Fire : सोलापूरमध्ये कौटुंबिक वादातून माथेफिरुने पेटवले स्वतःचेच घर
सोलापूरमध्ये कौटुंबिक वादातून माथेफिरुने पेटवले स्वतःचेच घर
Follow us on

सोलापूर : कौटुंबिक वादा (Family Dispute)तून एका माथेफिरु इसमाने स्वतःचेच घर पेटवल्याचे (Fire) धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली आहे. सुदैवाने घरात पत्नी आणि मुले नसल्याने जीवितहानी टळली. मात्र यात एक घर पेटल्यामुळे शेजारील घराचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवली. श्याम भंडारी असे घर पेटवणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आग लावणाऱ्या व्यक्तीविरोधात एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. (In Solapur, a man set fire to his own house due to a family dispute)

पत्नीसोबत झालेल्या वादातून पेटवले घर

श्याम भंडारी हा सोलापुरातील गोदुताई विडी घरकुल रोडवरील माळीनगर येथे कुटुंबासोबत राहतो. श्यामचे नोहमी त्याच्या पत्नीसोबत वाद होत होते. मागील चार दिवसापासून श्याम पती-पत्नीचे वाद झाल्यानंतर घर पेटवण्याची धमकी देत होता. आज त्याने ती धमकी प्रत्यक्षात उतरवली. पत्नी आणि मुले घरातून निघून गेल्यानंतर श्याम भंडारी याने घर पेटवले.

शहापूरमध्ये केमिकल कंपनीला भीषण आग

शहापूरमधील कांबारे येथे वणव्यामुळे केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाची कुठल्या प्रकारची यंत्रणा किंवा लोकल पाण्याच्या टँकर उपलब्ध नसल्याने आगीने उग्ररुप धारण केले. कांबारे येथील केमिकलपासून फायबरच्या टाक्या बनवणाऱ्या कंपनीच्या परिसरातील जंगलाला वणवा लागला आणि हा वणवा कंपनीपर्यंत आला. या वणव्यामुळे कंपनीला आग लागली व आगीमध्ये लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. (In Solapur, a man set fire to his own house due to a family dispute)

इतर बातम्या

Ulhasnagar Accident : उल्हासनगरात रिक्षा-टेम्पोची जोरदार धडक, काचा चेहऱ्यात घुसल्याने रिक्षाचालक जखमी

Pune Crime : घरफोडी आणि चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीचे चाकण पोलिस ठाण्यातून पलायन