शाईफेक अजूनही सुरूच; पुण्यानंतर आता सोलापूरात भाजप आमदारावर फेकली शाई…

| Updated on: Dec 13, 2022 | 11:11 PM

पुण्यानंतर आता सोलापूरातही भाजपच्या आमदारावर शाईफेक करण्याचा प्रयत्न झाल्याने या घटनेची आता जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

शाईफेक अजूनही सुरूच; पुण्यानंतर आता सोलापूरात भाजप आमदारावर फेकली शाई...
Follow us on

सोलापूरः राज्यात गेल्या दोन दिवसापूर्वी पुण्यात भाजपचे मंत्री आणि ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. त्यानंतर राजकीय वातावरणासह सामाजिक वातावरणही ढवळून निघाले होते. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर संबंधिति व्यक्तीला पोलिसांनी ताब्या घेतले होते. हे प्रकरण ताजे असतानाच सोलापूरात आज भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर शाईफेकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

त्यानंतर ज्या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी शाईफेकण्याचा प्रयत्न केला. त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक करण्यात आली आहे. शाईफेक करण्याचे प्रकार वाढल्यामुळे आता राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख आज एका विवाहाला गेले होते. त्यावेळी विवाह ठिकाणीच भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांकडून विजयकुमार देशमुख यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यावेळी सुरक्षिततेसाठी असलेल्या पोलिसांमुळे शाईफेक करण्याचा त्यांचा प्रयत्न फसला आहे.

विजयकुमा देशमुख यांच्यावर शाईफेकल्यानंतर घटनास्थळी जोरदार गोंधळ उडाला होता. मात्र त्यानंतर शाईफेकणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

भाजप आमदारांविरोधात असे प्रकार आता वाढत असल्याने पोलिसांकडूनही आता काळजी घेतली जाऊ लागली आहे. मागील दोन दिवसांपूर्वी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही पुण्यात शाईफेक करण्यात आली. त्यानंतर ज्या समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्याने शाई फेकली होती. त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर वेगवेगळी कलमं लावण्यात आली होती.

समता सैनिक दलाच्या कार्यकर्त्यावर वेगवेगळी कलमं लावली गेल्याने चंद्रकांत पाटील यांचे शाईफेक प्रचंड गाजले. तर चंद्रकांत पाटील यांच्या सोबत असलेल्या पोलिसांपैकी 11 पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण प्रचंड गाजले होते.

तर त्यानंतर आता विजयकुमार देशमुख यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतरही या प्रकरणाची सोलापूरसह महाराष्ट्रात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.