कन्नडिगांना जशास तसे उत्तर; कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे केले दहन…

| Updated on: Dec 09, 2022 | 4:33 PM

शिंदे गटाने कर्नाटकाला आमच्या मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन कराल तर कर्नाटकात घुसून आम्ही तुमच्या नेत्यांचे पुतळे जाळू असा थेट इशारा देण्यात आला आहे.

कन्नडिगांना जशास तसे उत्तर; कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे केले दहन...
Follow us on

सोलापूरः कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या वेळेपासून सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील गावांवर दावा केल्यापासून हा सीमावाद प्रचंड चिघळला आहे. त्यातच महाराष्ट्रातून कर्नाटकात गेलेल्या वाहनांची तोडफोड केल्यानंतर दोन्ही राज्यात तीव्र आंदोलन करून निदर्शनं करण्यात आली. तर गदगमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन करून महाराष्ट्राविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.

त्यामुळे कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांविरोधात महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. कर्नाटकातील गदगमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले होते.

यावेळी महाराष्ट्रविरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती. तर महाराष्ट्र पासिंगच्या वाहनांवर चढून धिंगाणाही घालण्यात आला होता.

या प्रकाराला आता जशास तसे उत्तर देत सोलापूरातही कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमई यांच्या पुतळ्याचे दहन करून कर्नाटकाविरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली.

यावेळी शिंदे गटाने कर्नाटकाला आमच्या मुख्यमंत्र्यांविरोधात आंदोलन कराल तर कर्नाटकात घुसून आम्ही तुमच्या नेत्यांचे पुतळे जाळू असा थेट इशारा देण्यात आला आहे.

त्यामुळे आता हा वाद आणखी चिघळल्याचे दिसून येत आहे. शिंदे गटाचे युवासेना जिल्हा प्रमुख सागार शितोळे यांनी कर्नाटक सरकारविरोधात जोरदार निदर्शनं करत मुख्यमंत्री बसवराज बोमईंचा पुतळ्याचे दहन केले आहे.

यावेळी त्यांनी कन्नड रक्षण वेदिका या संघटनेविरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शिंदे गटाच्या युवा सेनेने कन्नड रक्षण वेदिकेच्या संघटनेचा निषेध व्यक्त करत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याविरोधात जर कोणतेही आंदोलन केले गेले. तर मात्र युवासेनेने कर्नाटकात घुसून तुमच्या नेत्यांच्या पुतळ्याचे दहन करू असा इशारा दिला आहे.