सोलापूर : अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील राजकारण टोकाला गेलेले असतानाच सोलापूर जिल्ह्यात मात्र आता वेगळं चित्र समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अहिल्याबाई होळकर जयंतीवरून आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यामध्ये जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. एकमेकांना आव्हान देत अहमदनगर जिल्ह्यात 31 मे रोजी होणाऱ्या जयंतीवरून आता राजकारण तापले आहे. रोहित पवार यांनी अहिल्यादेवी होळकर जंयतीनिमित्त आम्ही मिरवणूक काढणारच असा पवित्रा घेतला होता. त्यावरून राम शिंदे यांनी सवाल उपस्थित करुन साऱ्या जिल्ह्याचे श्रद्धास्थान असलेल्या अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असं कुणीही कृत्य करु नये असा आवाहन केले होते, तर सोलापूर जिल्ह्यात मात्र या विरुद्ध चित्र दिसत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना रंगलेला असतानाच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
त्यामुळे आता पडळकरांचे केलेले कौतुक आता चर्चेचा विषय बनला आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांच्याकडून भाजपच्या गोपीचंद पडळकरांचे कौतुक करण्यात आल्याने त्यांची चर्चा केली जाऊ लागली आहे.
अजिंक्यराणा पाटील यांनी त्यांचे कौतुक करताना म्हणाले की, गोपीचंद पडळकरसाहेब आपण एका समाजाचे नाहीत तर सर्व समाजाला न्याय देण्यासाठी झटत असता. तर “गोपीचंदजी शेठ आपण नादच केला थेट” अशा शब्दातही त्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
एकीकडे गोपीचंद पडळकर शरद पवार, रोहित पवार यांच्यावर सडकून टीका करत असतात. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी प्रदेशाध्यक्षाकडून त्यांचे कौतुक करण्यात आल्याने आता वेगवेगळे राजकीय अंदाज बांधले जात आहेत.
यावेळी पडळकरांचे कौतुक केल्यानंतर समर्थकांकडूनही सभागृहात टाळ्या आणि शिट्ट्या वाजवून त्यांच्या या कौतुकाला दाद देम्यात आली. सोलापूरात अहिल्यादेवी होळकर यांच्या 51 पूर्णकृती पुतळ्याचे वाटप कार्यक्रमादरम्यान अजिंक्यराणा पाटील यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.